Maharashtra Municipal Elections x
महाराष्ट्र

मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

Maharashtra Municipal Elections: उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सर्वच ठिकाणांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लावता येतील का? यावर प्रश्न उपस्थित केला. यावर आज सुनावणी पार पडेल.

Bhagyashree Kamble

तब्बल ८ वर्षांनंतर नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. राज्यातील विविध भागांत मतदन प्रक्रियेला वेग आला आहे. सुरूवातीला निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी २ डिसेंबरला मतदान प्रक्रिया आणि ३ डिसेंबरला निकाल लागेल, असं घोषित केलं होतं. मात्र, नंतर काही प्रभागांमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्यानं २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी घेण्याचा सुधारित आदेश आयोगानं काढला.

दरम्यान, सोमवारी या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लावता येतील का? अशी विचारणा केली.

निवडणूक आयोगाच्यावतीनं वकीलांनी यासंदर्भातील निवेदन मंगळवारी दुपारी सादर करण्यात येईल, अशी माहिती दिली.

पैठण, कोपरगाव, अंबाजोगाई तसेच उदगीर येथील याचिकाकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. यानंतर निवडणुकांची तयारी झाली. निवडणूक अधिकारी तसेच स्टाफ केंद्रांवर पोहोचले. यानंतर न्यायालयानं सांगितलं की, 'ज्या ठिकाणी निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार आहेत, तेथे मतदान प्रक्रियेस परवानगी आहे', असं सांगितलं.

निकाल ३ला की २१ डिसेंबरला?

काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रद्द करीत निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमाबाबत दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली. यावेळी न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेणेगावकर यांनी सर्वच संस्थांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करता येतील का? असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे वकील सचिंद्र शेट्ये यांनी मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निवेदन सादर करू, असं सांगितलं. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार, निकाल हा ३ डिसेंबरला जाहीर होणार असल्याचं सांगितलं. पण ज्या ठिकाणी वाद निर्माण झाले, तेथे २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचा नवीन आदेश आयोगानं २९ नोव्हेंबर रोजी जारी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

राज्यातील सर्वात 'ढ' पक्ष म्हणजे उबाठा, नगरपालिका निवडणुकीनंतर कोणी केली टीका? VIDEO

Skin Care : रोज चेहऱ्यावर पावडर लावता? मग थांबा जाणून घ्या काय होतील साईड इफेक्ट्स

Mangalsutra Design: जान्हवीच्या 'त्या' जुन्या मंगळसूत्राची अजूनही क्रेझ; लग्नसराईत कोणत्याही लूकवर दिसेल एकदम भारी!

Accident : बुलढाण्यात भीषण अपघात, भरधाव कार झाडाला धडकली; दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT