AJIT PAWAR 
महाराष्ट्र

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Election Result, Ajit Pawar Press Conference: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती येताच अजित पवारांनी महायुतीच्या विजयाचा फॅक्टर सांगितला आहे.

Ankush Dhavre

Ajit Pawar Press Conference, Maharashtra Election Result: राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीनंतर आज ( २३ नोव्हेंबर) मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुका झाल्यानंतर हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात टफ फाईट होणार, अशी चिन्ह होती.

मात्र निकाल महायुतीच्या बाजूने लागल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. मतोमोजणी सुरु असताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'आज सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज व्यक्त करत होते. आम्ही तिघे कशातच नव्हतो. पहिल्यांदा पावणेदोनशेच्या पुढे जाऊ असं वाटत होतं. काल कुठेतरी पाहिलं की आणखी कमी जागा होतात की काय असं वाटलं होतं.'

महाराष्ट्रातील तमाम जनतेचं धन्यवाद

महायुतीच्या विजयानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले,' सगळे कार्यकर्ते, उमेदवार, सहकारी, मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहकारी, स्वतःची निवडणूक समदून कामाला लागले. योजनांची चेष्टा मस्करी केली. टीका केली, टीका झाली. नंतर जाहीरनामे बाहेर आले. आम्हाला दिसलं की कुठलाही हिशेब न ठेवता बाहेर आले. आम्ही लोकसभेच्या निमित्ताने आम्हाला महाराष्ट्रात अपयश आले. आम्ही मान्य केले. त्यातून आम्ही सावरलो. अर्थसंकल्प सादर करताना तिघांनी मिळून योजना जाहीर केल्या. त्या इतक्या पॉप्युलर झाल्या. गेमचेंजरच योजना झाली. सगळे उताणे पडले. आडवे पडले.'

महायुतीच्या यशानंतर आम्ही हुरलून जाणार नाही. जमिनीवर पाय ठेवून काम करू,असं अजित पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. ते म्हणाले.'महायुतीला कुठल्याही आघाडीला कधीही महाराष्ट्रात यश मिळाल्याचे पाहण्यात आले नाही. पूर्वी कधी झालं असलं तरी माहीत नाही. अलीकडच्या काळात इतकं प्रचंड यश पहिल्यांदाच मिळालं. .आम्ही हुरळून जाणार नाही. जमिनीवर पाय ठेवून काम करू....'

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याने देवेंद्र फडवणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येऊन राज्याचा कारभार हाती घेणार आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले,'देवेंद्रजी खूप काम करावं लागेल.आर्थिक शिस्त आणावी लागेल. अनुभवी माणसं आहोत. काही अडचण नाही. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. तो खूप आधार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

O'Romeo vs Tu Yaa Main : शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' फ्लॉप की हिट? तर 'तू या मैं' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

Aadhaar Vacancy 2026: खुशखबर! 'आधार'मध्ये नोकरीची संधी; २५२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! कळव्यात मोठी वाहतूक कोंडी...

Maharashtra Politics: शिंदेसेना करणार भाजपचा गेम? सत्तेचं समीकरण बदलणार, कोण किंगमेकर ठरणार?

Shocking : फार्मसीच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण उघड

SCROLL FOR NEXT