Manasvi Choudhary
अनेकजण डाएटमध्ये गोड पदार्थ खाणे टाळतात. पण तुम्हाला माहितीये का? जर तुम्ही महिनाभर साखरेचे पदार्थ बंद केले, तर तुमच्या शरीरात बदल दिसतात.
साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने खाली येते, ज्यामुळे थकवा जाणवतो. साखर बंद केल्यावर तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी नियंत्रणात राहते
साखरेमुळे शरीरात 'इन्फ्लेमेशन' वाढते, ज्यामुळे त्वचेवरची मुरुमे आणि त्वचेच्या पिंगमेटेंशन वाढते. साखर बंद केल्यानंतर साधारण २-३ आठवड्यांतच त्वचा ग्लो करण्यास सुरूवात होते.
साखर बंद केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते यामुळे वजन देखील कमी होते.
अति साखरेमुळे पोटातील 'बॅड बॅक्टेरिया' वाढतात. साखर बंद केल्याने पचनशक्ती सुधारते, पोट फुगण्याची समस्या देखील कमी होते
पहिल्या काही दिवसांत गोड खाण्याची इच्छा तीव्र होईल मात्र हळहळू शरीर साखरेवर अवलंबून राहणे थांबवेल त्यानंतर तुमची नैसर्गिक गोड खाण्याची इच्छा कमी होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.