Manasvi Choudhary
पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यात सर्वांनाच काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते.
पावसाल्यात आपण भजी- वडापाव नेहमीच खातो. तुम्हालाही जर नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी खालील रेसिपी ट्राय करू शकता.
क्रिस्पी मटार रेसिपी ही तुम्ही संध्याकाळी नाश्त्याला करू शकता. कमी साहित्यात ही रेसिपी होते. टेस्टही छान लाहते.
क्रिस्पी मटार बनवण्यासाठी मटार, आलं- लसूण मिरची पेस्ट, मसाला, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, मीठ आणि तेल साहित्य घ्या.
क्रिस्पी मटार बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर एका पातेल्यामध्ये मीठ मिक्स करून मटार चांगले शिजवून घ्या.
मटार शिजल्यानंतर त्यातील पाणी निथळून घ्या. मटार कोरडे झाले की एका प्लेटमध्ये आलं, लसूण मिरची पेस्ट, कॉर्नप्लोअर, मीठ, मसाला मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मटार सोनेरी रंगाचे होईपर्यंत खरपूस फ्राय करा. फ्राय मटारवर चाट मसाला टाकून सर्व्ह करा.