Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात? स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

Saam Tv

डिजिटल युगातील मुले

आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि गॅझेटवर जास्त वेळ घालवतात त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी होते आणि याचा वाईट परिणाम त्यांच्या तब्बेतीवर होतो.

Child Health | pintrest

तंदुरुस्त मुले

अशा परिस्थितीत मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे आणि त्यांना मजेदार फिटनेस करायला लावणे महत्वाचे आहे, जेणेकरून मुलं तंदुरुस्त आणि त्यांचे हृदय निरोगी राहील. यासाठी तुम्ही या काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

Child Health | pintrest

फॅमिली डान्स पार्टी

मुलांच्या आवडत्या गाण्यांवर दर आठवड्याला लहान मुलांची घरगुती डान्स पार्टी आयोजित करा.यामुळे मुलांना मित्रांसोबत वेळ घालवता येईल,मुले अॅक्टिव्ह होतील.

Child Health | pintrest

बाहेरील खेळ

अभ्यासाच्या वेळेसोबतच दिवसभरातून कमीतकमी १ तास मुलांना बाहेर खेळू द्यावे. क्रिकेट, फुटबॉल, लपाछपी इ.

Child Health | pintrest

पुस्तक वाचण्यासाठी वेळ

यावेळेत मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तक वाचण्यासाठी प्रोत्साहन द्या.खास लहान मुलांसाठी डिझाईन केलेली मासिके, पुस्तके मुलांना वाचायला द्या

Child Health | pintrest

ट्रेकिंग आणि स्केटिंग

मुलांचे मन साहसी खेळांमध्ये गुंतवा. मुलांसोबत ट्रेकिंग किंवा स्केटिंगला जा.यामुळे त्यांची भीती कमी होईल अन् मुले धाडसी होतील

Child Health | pintrest

बागकाम

मुलांना बागकामात सहभागी करून घ्या, झाडांना पाणी देणे, छाटणी करणे, जपणे यामुळे मुलांमधील आक्रमकता कमी होऊन, काळजी, प्रेम यांसारख्या भावना उमलू लागतील.

Child Health | pintrest

पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा

वेळात वेळ काढून मुलांशी गप्पा मारा.अवांतर विषय नवीन अनुभव,गोष्टी मुलांबरोबर शेअर करा. मुलांना त्यांच्या मनातले बोलू द्या यामुळे मुलांचे आणि पालकांचे बॉण्डिंग वाढेल, मुलं संवादकौशल्य शिकतील.

spending time with kids | pintrest

हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Skin Care Tips | meta ai
येथे क्लिक करा