Saam Tv
त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आपण धडपडत असतो. पण हवा तसा कायमचा नैसर्गिक ग्लो मिळतच नाही. तुम्ही जर आहारात खालील गोष्टींचा समावेश केल्यास तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.
सेलेनियम हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवते, ज्यामुळे सुरकुत्या, कोरडेपणा नष्ट होतात. हे ब्राझिलियन नट्स, कोळंबी, ट्यूना, सॅल्मन, गव्हाचा पास्ता, हलके टर्की यांसारख्या पदार्थांमध्ये आढळते.
CoQ10 हे एक अँटिऑक्सिडंट आहे, जे वाढत्या वयानुसार शरीरात कमी होते. हे सॅल्मन, ट्यूना, पोल्ट्री, लिव्हर आणि धान्यांमध्ये आढळते. सुरकुत्या टाळण्यासाठी काही स्किनकेअर उत्पादनांमध्येही याचा समावेश असतो.
गाजर, खरबूज व संत्र्यांमध्ये, तसेच पालेभाज्या, अंडी आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये हे आढळते जे त्वचा कोरडी आणि पापुद्रे निघण्यापासून रोखते.
काही फॅट्स तुमच्यासाठी चांगले असतात. जे कोरडेपणा, डागांना दूर ठेवून त्वचा गुळगुळीत करतात. हे फॅटस कॅनोला तेल, जवस, अक्रोड आणि सॅल्मन, सार्डिन व मॅकरेल यामध्ये आढळतात.
संत्री, मोसंबी, आणि लिंबू यांसारख्या फळांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते, जे कोलेजन (Collagen) वाढवून त्वचेला नैसर्गिक चमक देते.
बदाम, अक्रोड, आणि चिया-फ्लेक्ससीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन-ई असते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते.
पालक, मेथी आणि कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, जे रक्त शुद्ध करून त्वचा निरोगी आणि सतेज ठेवतात.
यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-ए भरपूर असते, जे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करते आणि चेहऱ्यावर एक उबदार चमक आणते.
दिवसभरात भरपूर पाणी प्या. नारळपाणी आणि फळांच्या रसांमुळे सुद्धा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चेहरा तुकतुकीत दिसतो.