Shruti Vilas Kadam
कलकत्ता, बनारसी सारखी स्वाद आणि फ्रेशनेसाठी खाल्ली जाणारी ही पाने काही लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
गोड पानात वापरली जाणारी सुपारी, अति-साखर, गुलकंद, कात, चुना आणि कृत्रिम रंग-रसायने यामुळे काही विशिष्ट व्यक्तींसाठी त्याचे सेवन अत्यंत धोकादायक ठरू शकते.
पानात असलेली सुपारी लहान मुलांच्या घशात अडकू शकते. त्यातील कृत्रिम रंगामुळे लहान मुलांच्या पचनावर परिणाम होऊ शकतो.
पानात अतिप्रमाणात चुना आणि कात असतो, सेवनाने शरीरातील सोडियम आणि कॅल्शियमचे संतुलन बिघडते, ज्यामुळे रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
पानांमधील लवंग, सुगंधी लेप, कात, मसाले यामुळे अॅसिडची पातळी वाढण्याचा धोका असतो. ज्यामुळे पोटात जळजळ होते आणि हृदय जळू शकते.
बऱ्याच पानांमध्ये तीव्र सुगंधी द्रव्ये, मेथॉल आणि कृत्रिम सुवास वापरलेले असतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
पानात गुलकंद आणि अनेक गोड पदार्थ असतात, त्यामुळे कॅलरिजचे प्रमाण प्रचंड असते यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.
गोड पान खाऊन शरीरावर कोणताही परिणाम झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.