Shruti Vilas Kadam
नखांवर पडलेल्या पांढरे डाग किंवा निशाणांना वैद्यकिय भाषेत ल्युकोनिचिया असे म्हणतात.
नखांच्या मुळाशी (मॅट्रिक्स) लागलेला धक्का, नख आपटणे किंवा नखे खाण्याची सवय यामुळे नखांवर पांढरे डाग येऊ शकतात .
कॅल्शिअम मुळेच नव्हे तर शरीरात झिंक, लोह किंवा प्रथिनांची कमतरता असल्यामुळे देखील डाग पडू शकतात.
निकृष्ट दर्जाचे नेलपॉलिश, नेल रिमूव्हर किंवा कृत्रिम नखांमधील रसायनांचा वापर केल्याने नखांवर अॅलर्जी येते.
सतत ओलावा असणे किंवा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पांढरे पिवळे डाग पडू शकतात.
नखांवर आडव्या पांढरे रेषेत डाग असतील हे गंभीर आजार, तीव्र कुपोषण किंवा काही औषधांच्या दुष्परिणाम असू शकतात
नखांवर खालून वर जाणाऱ्या उभ्या रेषा दिसत असतील . तर हे कदाचित नखांच्या खाली असलेल्या त्वचेच्या समस्येमुळे असू शकते
जर अख्खे नख पांढरे पडले असेल तर हे सहसा यकृत (Liver Failure) किंवा किडनीचे आजार संबंधित असू शकते.
नखांवरील पांढरेपणा वाढला, वारंवार येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.