Groom Vote
Groom Vote  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Election:'आधी मतदान, मग लग्न'; रामटेकमध्ये लग्नाआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Rohini Gudaghe

नागपूरमध्ये (Nagpur) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावामध्ये (Bela Village) नवरदेवाने 'आधी मतदान, मग लग्न'अशी भूमिका (Groom Vote) घेतल्याचं दिसतंय. हा तरूण मतदान करून लग्नस्थळी रवाना झाला आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावामध्ये लग्नाआधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 'स्वप्नील डांगरे' असं या नवरदेवाचं नाव आहे. स्वप्नीलचं आज लग्न आहे. त्याने आधी मतदान केंद्रावर (Ramtek Lok Sabha Constituency) येऊन मतदान केलं. त्यानंतर तो लग्नासाठी लग्नस्थळी रवाना झाला आहे.

बेसिक शाळा या मतदान केंद्रावर मतदान करून नवरदेव लग्नासाठी नातेवाईकांसह रवाना झाला आहे. ही घटना रामटेक लोकसभा मतदारसंघात समोर आली (Maharashtra Election 2024) आहे. नवरदेवाने लग्नाआधी मतदार केंद्रावर येऊन मत दिलेलं आहे. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीसह नवरदेव लग्नमंडपाकडे रवाना झालाय.

आधी मतदान करेन आणि मगच लग्नाच्या बोहल्यावर चढेन, असा निश्चय बेला गावातील स्वप्निलने केला होता. तो सार्थ ठरवत आज मतदान करुनच तो विवाह मंडपाकडे रवाना झाला (Lok Sabha) आहे. मतदान केंद्रात प्रवेश करताच पोलिसांसह कर्मचाऱ्यांच्या नजरा नवरदेवार खिळल्या होता. स्वप्निल लग्नाच्या कपड्यांमध्येच मतदान केंद्रावर गेला (Ramtek Lok Sabha) होता.

नागपूरमध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत सुरू होत आहे. त्यामुळे ( Lok Sabha Election) आता गडकरी नागपुरमध्ये हॅट्रिक मारणार की विकास ठाकरे नागपूरचा विकासरथ आपल्या हाती घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी मुंबई : बनावट नोटांच्या छापखान्यावर पाेलिसांची धाड, 2 लाखांच्या नाेटा जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : शेवाळेवाडीत कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

SCROLL FOR NEXT