Maharashtra Hingoli Earthquake Update New Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News : भूकंपाच्या धक्क्यांमुळे लग्न जुळेना, पांगरा शिंदे गावातील २०० मुलं बिन लग्नाचे, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Hingoli Earthquake Update News : हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात वारंवार भूकंपामुळे मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. २०० हून अधिक तरुणांचे विवाह अडकले असून नागरिक चिंतेत.

Alisha Khedekar

  • हिंगोलीत ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप

  • पांगरा शिंदे गावात सामाजिक समस्या निर्माण

  • २०० पेक्षा जास्त तरुणांचे लग्न अडकले

  • वारंवार भूकंपामुळे नातेवाईक संबंध टाळत आहेत

Maharashtra 12th April Earthquake Update महाराष्ट्रातील मराठवाड्यात काही जिल्ह्यांना काल म्हणजेच शनिवारी भूकंपाचे तीव्र हादरे बसले. या धक्क्यांनी गावातील घरांचे पत्रे, सामान कोसळले, तसेच स्थानिकांनी घाबरून घराबाहेर पलायन केले. मात्र भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भूकंपामुळे या गावातील मुलांचे लग्नचं ठरतं नसल्याने मुलांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

हिंगोलीत भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या पांगरा शिंदे गावात आता भूकंपामुळे सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या गावात मुलींचे आई-वडील विवाह सोहळ्यासाठी मुलगीच देत नसल्याचे पुढे आले आहे. २०१७ पासून पांगरा शिंदे गावात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काल देखील आठ वाजून ४५ मिनिटाला भूकंपाचा तीव्र धक्का बसलेला आहे.

या भूकंपाची तीव्रता ४.७ रिष्टर स्केअर एवढी असल्याचे भूमापक केंद्राने स्पष्ट केले आहे. दरम्यान काल झालेल्या भूकंपामुळे पांगरा शिंदे गावात अनेक जुनी मातीची घरे पडली आहेत, तर गावातील नागरिकांना शेतीक्षेत्र कमी असल्याने त्यातच सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने, नातेवाईक पांगरा शिंदे गावात नातेसंबंध करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे गावकरी सांगत आहेत. या सामाजिक समस्येमुळे गावात २०० पेक्षा अधिक तरुण विवाह करण्याच्या प्रतीक्षेत असल्याच देखील गावकऱ्यांनी म्हटल आहे.

नांदेड, परभणीत भूकंप

नांदेडमध्ये शनिवारी सकाळी ८:४५ च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपामुळे जमीन आणि घरांचे नुकसान झाले. भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरीक घरा बाहेर पडले होते. परभणीत देखील सकाळच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले होते. या भूकंपाच्या हादऱ्याने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT