Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात १६ टक्के पावसाची तूट असून मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती चिंताजनक आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Maharashtra rain forecast next five days : पावसाची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजासह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यंदा जून महिन्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल १६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील अनेक तालुक्यांमध् दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे १० ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता आहे. पण परतीच्या पावसासाठी सध्या हवामान अजिबात अनुकूल दिसत नाही. भारतीय हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुढील ५ दिवस पाऊस गायब?

पुण्यातील हवामान तज्ज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची कोणतीही शक्यता नाही. सध्या कोणतीही हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नसून, मान्सूनचे वारेही मंदावले आहेत. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले नाही. त्यामुळे पुढील ५ दिवस राज्यात कुठेही मुसळधार पाऊस होणार नाही. केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, परंतु सर्वदूर पाऊस पडणार नाही.

मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती गंभीर

राज्यात सरासरी १६ टक्के तूट असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात पावसाची तूट ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात तर ही तूट थेट ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. यामुळे या भागातील पिके करपण्याच्या मार्गावर असून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

'एल निनो'चा फटका; २०१५ सारखी परिस्थिती?

हवामानशास्त्रज्ञांच्या मते, यावर्षी 'एल निनो' (El Niño) चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यापूर्वी २०१५ मध्येही असाच एल निनो सक्रिय होता, ज्या वर्षी महाराष्ट्रात अत्यंत कमी पाऊस झाला होता. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाही महाराष्ट्रात पावसाने मोठी ओढ दिली आहे.

परतीच्या पावसाचीही शाश्वती नाही

मान्सूनच्या परतीचा पाऊस लगेचच पडेल किंवा तो सर्वदूर होईलच असे नाही, ते तत्कालीन हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. सध्या परतीच्या मान्सूनसाठी आवश्यक असलेले वातावरण तयार होत नसल्याने, परतीचा पाऊसही महाराष्ट्राला हुलकावणी देणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून माघार घेण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भायखळा येथे तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Pune Crime: पुणे हादरले! शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, प्रॉपर्टीसाठी आजोबानेच नातवाला संपवलं

Sleeping : ८ तासांची पुरेपूर झोप काढली, पण तरीही थकल्यासारखं वाटतं; असू शकतात 'ही' ५ गंभीर कारणे

Sanjay Raut : संजय राऊत यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील मोर्चात आली भोवळ

High blood pressure: सकाळी सकाळी या 6 पैकी 1 ड्रिंक नक्की ट्राय करा, ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT