Maharashtra Drought: Demand to Divert 50 TMC of Water Used by Tata Power’s Hydropower Projects to Drought-Affected Regions saam tv
महाराष्ट्र

टाटा पॉवरचं पाणी दुष्काळग्रस्तांना द्या! वीज निर्मिती थांबवावी, सरकारनं तूट भरून काढावी

Tata Power’s Hydropower Projects Under Scrutiny: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मैलोनमैल वणवण करावी लागतेय. पाण्याच्या या संघर्षामुळे राज्यातल्या जलविद्यूत प्रकल्पातलं पाणी दुष्काळी भागात वळवण्याची मागणी जोर धरू लागलीय. कोणते आहेत हे प्रकल्प? नेमकं कोणत्या धरणांचं आणि किती पाणी या प्रकल्पांना जातं? पाहूयात हा विशेष रिपोर्ट

Snehil Shivaji

महाराष्ट्रातील 305 तालुक्यांमध्ये सध्या भीषण दुष्काळ आहे. शेतकऱ्यांपासून जनावरांंपर्यंत सगळेच पाण्याच्या एका-एका थेंबासाठी व्याकूळलेत. गावागावांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असतानाच, पुणे जिल्ह्यातील ६ धरणांमधील टाटा पॉवरला जाणाऱ्या पाण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. भीमा खोऱ्यातलं सुमारे ५० टीएमसी पाणी टाटा पॉवरसाठी वापरलं जातं. आणि हे वापरलेलं पाणी समुद्रात सोडण्यात येतं असा आरोप किसान आर्मी वॉटर संघटनेचे अध्यक्ष प्रफुल कदम यांनी केलाय.

टाटांच्या कोणत्या वीज प्रकल्पात कोणत्या धरणातून पाणी येतं आणि ते वापरानंतर कुठं जातं ते पाहूयात.

टाटा पॉवरसाठी पाणी

कुठून येतं आणि कुठे जातं?

डॅमप्रकल्पपाणी कुठे जातं?

भुशी खोपोली उद्योगांना

वळवण

शिरवटा

सोमोडी

टाटा पॉवरसाठी पाणी

कुठून येतं आणि कुठे जातं?

डॅमप्रकल्पपाणी कुठे जातं?

ठोकरवाडी भिवपुरी उल्हास नदीत जातं

टाटा पॉवरसाठी पाणी

कुठून येतं आणि कुठे जातं?

डॅमप्रकल्पपाणी कुठे जातं?

मुळशी भीरा कोलाड शहर

टाटा पॉवरला जाणारं पाणी वळवण्याचा मुद्दा या पूर्वीही सरकारी पातळीवर चर्चिला गेलाय. यावर सरकारनं समितीही स्थापन केली होती. मात्र इतर समित्यांचं होतं तेच या समितीचंही झालेलं दिसतंय. नेमकं काय आहे हा पाणी वळवण्याचा मुद्दा ते पाहूयात...

टाटा पॉवरचं पाणी वळवण्याच्या समितीचं काय झालं?

पुणे जिल्ह्यातील 6 धरणांमधील सुमारे 50 TMC पाणी टाटा पॉवरला

टाटाला जाणारं पाणी टप्प्याटप्प्यानं दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा निर्णय

सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी फायदा होऊ शकतो

2018मध्ये निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 9 सदस्यीय समितीची स्थापना

टाटाच्या 3 प्रकल्पांमधून सुमारे 500 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येते.

त्यामुळे या जलविद्यूत प्रक्लातील वीज निर्मिती थांबवून सरकारनं ही तूट भरून काढावी आणि हे पाणी उजनीच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात वळवण्याची मागणीही दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी केलीय.

सरकारनं जर ५०० मेगावॉट वीजेची तूट भरून काढण्याची उपाययोजना केली तर भीमा खोऱ्यातलं हक्काचं ५० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आधी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं जर काही शिफारशी केल्या असतील तर त्यावर योग्य ती अंमलबजावणी करून कोयना वीज प्रकल्पाचं आणि टाटा पॉवरचं पाणी वळवण्याचा निर्णय नक्कीच दुष्काळग्रस्तांच्या आयुष्य बदलणारा क्रांतीकारी निर्णय़ ठरू शकतो. त्यामुळे सरकारनं याबाबद गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे,.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लवकरच टेस्लाची हवेत उडणारी कार, ताशी 97 किमी वेगानं उडणार कार

Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

BMC कार्यालयाच्या वॉशरूममध्ये दारूच्या बाटल्या; महापालिका कार्यालयात नेमकं चाललंय काय?

कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

SCROLL FOR NEXT