MAHARASHTRA DROUGHT CRISIS saam tv
महाराष्ट्र

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

Maharashtra Drought Crisis: महाराष्ट्रावर दुष्काळाचं महासंकट आलंय. राज्यातल्या तब्बल २० जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी पुरता हवालदिल झालाय. कोणते आहेत हे जिल्हे आणि काय आहे इथली स्थिती पाहूयात हा रिपोर्ट......

Suprim Maskar

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला.. यामुळे राज्यातील 20 जिल्ह्यांतील 91 तालुक्यांत तीव्र दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून खरिपाची पिकं पूर्णपणे करपलीयत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण परिस्थिती निर्माण झालीय. जुलैच्या अतिवृष्टीनंतर तब्बल दीड महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे दुष्काळ बळीराजाच्या जीवावर उठलाय....

धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी डोळे लावून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहेत.. अशातच करजखेडामध्ये एक चिमुकला सायकल घेऊन मुख्यमंत्र्यांची वाट पाहत असल्याचं दिसलं... नांदेडच्या दाभड परिसरात पावसाअभावी सोयाबीनच्या पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याच्या रागातून शेतकऱ्याने स्वतःच्या करपलेल्या सोयाबीन पिकाला आग लावलीय...

दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील बावणबीर येथील एका तरुण शेतकऱ्याने पावसाने पाठ फिरवल्याने पीक करपून गेल्याच्या नैराश्यातून थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिलयं...

तर बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासह सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत... संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनच्या पिकासह बैलगाडी पेटवून सरकारचा तीव्र निषेध केलाय...

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील राजापूर येथे सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि तोंडावर आलेले सण-उत्सव यामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय..

मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांवर दुष्काळाचं संकट आहे ते पाहूयात...

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांत पिकांना मोठा फटका बसला आहे. तर विदर्भातील बुलढाणा, नागपूर, अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत पावसाअभावी पिकांचं नुकसान झालं आहे.

राज्यातील शेतकरी सध्या पूर्णपणे कोलमडून गेलाय. सरकारनं त्यामुळे भरघोस आर्थिक मदत, पीक विमा भरपाई आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय तातडीने करावी, अन्यथा दुष्काळानं हैराण झालेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, मुख्यमंत्र्यांसमोरच फोडला बळीराजानं टाहो

SIRवरून निवडणूक आयुक्त भिडले, निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

वारकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील भजनी मंडळांना मिळणार अनुदान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Fact Check: गोविंदानं केलं दुसरं लग्न? दुसऱ्या पत्नीसोबत गोविंदा राजाच्या दर्शनाला?

Rain Alert : १९ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; अनेक राज्यांना वादळी तडाखा, ताशी ८० किमी वेगाने वाहणार वारे

SCROLL FOR NEXT