Maharashtra government DJ ban rules for Ganeshotsav 2026 saam tv
महाराष्ट्र

DJ वाजवाल तर जेलमध्ये जाल! गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर

Maharashtra Dj Ban Ganeshotsav Cm Fadnavis Major Signals: पुण्यातून सुरू झालेला DJ विरोधाचा सूर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलाय. नागपूरात तर थेट पोलिसांच्या आदेशालाच आव्हान दिलं गेलंय. मात्र, आता DJ बंदीवरून मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सण-उत्सव DJमुक्त होणार का?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

यंदाचा गणेशोत्सव शिस्तीत आणि नियमांच्या चौकटीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानं कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवातील डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटाला चाप बसणार आहे. पुण्यात डीजेवर बंदी घालण्यासाठी जोरदार आवाज उठवलाय. त्यामुळे पोलिसांनी डीजेच्या आवाजावर मर्यादा घातल्या. मात्र मुख्य़त्र्यांच्या नागपुरात पोलीस आयुक्तांनीही थेट डीजेला आळा घालण्यासाठी आदेश काढले. एवढंच नव्हे तर त्याची अंमलबजावणीही सुरू केली. नागपूरात बडकस चौकामध्ये होणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये डीजे वाजवणारच अशा पद्धतीची भूमिका आयोजकांनी घेतली. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी थेट कार्यक्रमस्थळी जात पाहणी केलीये. नागपूरचा हा पॅटर्न आता अनेक जिल्हा पोलीस प्रमुखांनी राबवायला घेतल्याचं दिसतंय. राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये डीजे आणि डॉल्बीवर आळा घालण्यात आलाय ते पाहूयात...

कोणत्या जिल्ह्यांमध्ये DJ बंदी?

पुणे

नागपूर

सोलापूर

नवी मुंबई

पनवेल

धुळे

विशेष म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनीही पारंपरिक पद्धतीनंच उत्सव आणि सण साजरा करण्याचा आग्रह धरला असून राज्यभरच डीजे बंदीचे संकेत दिले आहेत. आता गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. तर दुसरीकडे, डीजे आणि साऊंड सिस्टीमवर बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानं डीजे चालक-मालकांमध्ये नाराजी पसरलीये. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये बैठका होताहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर सबंध राज्यात DJ वर बंदी येणार का?...हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT