COCKROACH FOUND IN BIRYANI AT DHARASHIV'S MATOSHREE BIRYANI, CUSTOMER ALLEGES MISBEHAVIOUR Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळलं झुरळ, ४० किमीवरून आला, एक घास खाल्ला अन् धक्काच बसला!

Dharashiv Matoshree Biryani : धाराशिवमधील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणीच्या मुख्य शाखेत बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याचा ग्राहकाचा दावा. तक्रार केल्यानंतर दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप. अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत.

Alisha Khedekar

  • धाराशिवमधील बिर्याणीमध्ये झुरळ

  • तक्रार केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाकडून दमदाटी

  • प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करण्याचा ग्राहकाचा इशारा

  • घटनेमुळे हॉटेलच्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बिर्याणी सारखे पदार्थ आपण अगदी चवीने खातो. मात्र हे पदार्थ योग्य ठिकाणी न खाल्ल्यास ते जीवावर सुद्धा बेतू शकतात. तुम्ही सुद्धा बिर्याणी आवडीने खात असाल तर सावधान. कारण अशीच एक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीमध्ये झुरळ आढळलं आहे. विशेष म्हणजे, बिर्याणीची चव चाखण्यासाठी तब्बल ४० किलोमीटर अंतर पार करून ग्राहक आला होता. दरम्यान त्याच्या बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याने त्याचा संताप अनावर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहक आपल्या कुटुंबीयांसह धाराशिव येथील मातोश्री बिर्याणीच्या मुख्य शाखेत बिर्याणी खाण्यासाठी आला होता. हॉटेलमध्ये बिर्याणीची ऑर्डर दिल्यानंतर जेवण सुरू असताना बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे ग्राहक आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला.ग्राहकाने तत्काळ हॉटेलकडे याबाबत तक्रार केली. मात्र, तक्रारीची गंभीर दखल घेण्याऐवजी हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करण्यात आल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे.

तसेच, आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा दावाही संबंधित ग्राहकाने केला आहे. यामुळे ग्राहकाचा संताप आणखी वाढला . धाराशिवसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मातोश्री बिर्याणीच्या शाखा कार्यरत आहेत. त्यामुळे मुख्य शाखेमध्येच अशा प्रकारे अन्नपदार्थात झुरळ आढळल्याचा आरोप झाल्याने ग्राहकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

संतप्त ग्राहकाने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्याचा इशारा दिला आहे. तसेच संबंधित हॉटेलची तपासणी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्याने केली आहे. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात माध्यमांनी हॉटेल मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. आता अन्न व औषध प्रशासन या प्रकरणाची दखल घेते का आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT