मुलींचे शिक्षण आणि भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी मुंबईत '१००० मुली, १००० स्वप्ने, एक विश्वास' या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत १० वर्षांखालील मुलींसाठी 'सुकन्या समृद्धी योजना' आणि १० वर्षांवरील मुलींसाठी 'एनपीएस वात्सल्य योजना' अशा दोन प्रमुख सरकारी बचत योजनांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. घाटकोपर येथील कार्यक्रमात या १,००० लाभार्थी मुलींना त्यांच्या बचत खात्यांचे वाटप करण्यात आले असून, यामुळे गरजू आणि वंचित कुटुंबातील मुलींना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एम्पावरिंग हर फ्युचर: १००० बेटियाँ, १००० सपने, एक विश्वास' या विशेष उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. आज दुपारी या कार्यक्रमात १००० मुलींच्या खात्यांचे अधिकृत हस्तांतरण केले जाईल. मुलींमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घकालीन बचत निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता सभागृह एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट स्कूल, कमलाणे, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. संपत्ती निर्मिती आणि निवृत्तीवेतन सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दोन प्रमुख सरकारी योजनांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेला चालना देणे, दीर्घकालीन बचतीला प्रोत्साहन देणे आणि मुलींसाठी सुरक्षित भविष्य घडवणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाला फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड हेदेखील याप्रसंगी हजर असतील. हा कार्यक्रम गौरव भंडारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.