ajit pawar feliciated C-60 Jawans In Gadchiroli saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli: 'सी- ६० कमांडोज' साठी अजित पवारांनी जाहीर केले माेठं Gift

त्यावेळी झालेल्या चकमकीत चार राज्यांचा नक्षल प्रमुख असलेला मिलिंद तेलतुंबडे टिपला गेला होता. त्या सर्व पाेलीसांचा आज सन्मान सोहळ्यात कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काैतुक केले.

संजय तुमराम

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठेचं कौतुक करावे तेवढे थाेडे आहे. सी-६० जवानांनी (C-60 Jawan) यांनी वेळोवेळी नक्षलवाद्यांशी लढत असताना केलेल्या त्यागाची पराकाष्टा आम्हाला माहिती आहे. त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते गृह विभाग, अर्थ विभाग प्राधान्याने करेल. गडचिरोली जिल्ह्यातील कमांडोच्या भत्त्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी घाेषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली. (ajit pawar latest marathi news)

दरम्यान भोंग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे की लोकांच्या रोजीरोटीचा असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना करीत. राज ठाकरे यांच्या भुमिकेवर टीका केली. स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे झाली. मात्र आजवर हा प्रश्न कधी उपस्थित झाला नाही. या प्रश्नापेक्षा लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे असेही त्यांनी नमूद केले. तसेच राज्यात व देशात सत्तेसाठी अशा आघाड्या होत असतात असे मत मंत्री पवार यांनी भाजप - मनसे युतीच्या संदर्भात व्यक्त केले. देशात NDA-UPA अशा आघाड्या आपण पाहिल्या आहेत. त्यांची (bjp) (mns) युती झाली की नाही याबाबत संभ्रम आहे असे ही त्यांनी नमूद केले..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि गृहमंत्री वळसे पाटील (dilip walse patil) यांनी गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील अतिदुर्गम कटेझरी येथे भेट दिली. कटेझरी येथे पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. कटेझरी येथील पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची पवार यांनी पाहणी केली. यावेळी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात निष्ठेने काम करणाऱ्या पोलीस जवानांचे पवार यांनी कौतुक करीत आगामी काळातही गडचिरोलीतील पोलीस दलासाठी आवश्यक सुविधा देऊ असे आश्वासित केले. गडचिरोलीतील जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य, चांगले राहणीमानासाठी आम्ही प्राधान्याने कार्य करू. अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असेही मंत्री पवार यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात शहीद पोलीस स्मृती स्तंभावर हुतातम्यांना आदरांजली वाहिली. येथील शहीद पोलीस स्मृती गॅलरीला भेट देत मंत्री पवार यांनी माहिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिनटोला येथे १३ नोव्हेंबर २०२१ रोजी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमधील धाडसी पोलीस पथकाचा मंत्री पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT