रेल्वेने ४२ प्रवासी गाड्या अनिश्चित काळासाठी केल्या रद्द; जाणून घ्या कारण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
passenger train
passenger trainsaam tv
Published On

नवी दिल्ली: देशातील कोळशाची टंचाई लक्षात घेता तसेचअनेक राज्यांमध्ये वीजेचा तुटवडा जाणवू लागल्याने कोळशाच्या गाड्या जलद गतीने इच्छितस्थळी जाव्यात यासाठी देशातील सुमारे ४२ प्रवासी गाड्या रद्द (passenger trains) केल्या आहेत. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वेतील (railway) सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार सुमारे एका महिन्यासाठी ६७० प्रवासी गाड्या (train) रद्द करण्याची शक्यता आहे. (passengers trains cancelled latest marathi news)

भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक गौरव कृष्ण बन्सल यांनी ब्लूमबर्गशी बाेलताना गाड्या रद्द करणे हे तात्पुरते आहे. परिस्थिती सामान्य होताच प्रवासी सेवा (passenger train) पूर्ववत केल्या जातील अशी ग्वाही दिली.

passenger train
खुशखबर! एसी लोकलचे दर कमी होणार, प्रवासी संघटनांकडून केली होती मागणी

रेल्वेच्या म्हणण्यानुसार २४ मे पर्यंत ६७० प्रवासी गाड्या रद्द कराव्या लागतील. यामध्ये ५०० पेक्षा जास्त गाड्या लांब पल्ल्याच्या असतील. कोळशाने भरलेल्या दररोज ४०० हून अधिक गाड्या धावत आहेत. कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाच्या वाहतुकीसाठी दररोज ४१५ मालवाहतूक गाड्यांचा पुरवठा करण्याचा निर्धार रेल्वेने केला आहे.

दरम्यान गाड्या रद्द हाेऊ लागल्याने देशातील विविध राज्यात आंदाेलन देखील छेडले जात आहे. छत्तीसगडमध्ये यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या तीन गाड्या स्थानिक खासदारांच्या विरोधानंतर पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशातील परिस्थिती गंभीर आहे. एकत्रितपणे लवकरच तोडगा काढावा लागेल. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ट्विट (tweet) केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

passenger train
'भिंगरी' तल्या मुलाला देखील अशी मैत्री पटणार नाही; गो-हेंचा शेलारांवर पलटवार
passenger train
Accident: नगर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दाेन ठार, १० जखमी
passenger train
Raj Thackeray Aurangabad Sabha: '...तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com