Deputy CM Ajit Pawar addressing media on vote theft allegations in Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Ajit Pawar Comment On Vote Theft: विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतांची चोरी झालीय. यात निवडणूक आयोग आणि भाजपचं संगममत होत असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

  • २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत चोरीचे आरोप राहुल गांधींनी केले.

  • अजित पवार यांनी बारामतीचं उदाहरण देत आरोप फेटाळले.

  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याची तुलना करून स्पष्टीकरण दिलं.

  • काही लोकांना पराभव मान्य नसल्यामुळे ते आरोप करतात, असं अजित पवार म्हणाले.

राहुल गांधींनी मतांची चोरी झाल्याचा आरोपांवरून निवडणूक आयोग आणि भाजपला घेरलंय. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगात वाद पेटलाय. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या आरोपावर जोर देत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेत. मत चोरीचा आरोप होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीवरून प्रतिक्रिया दिलीय.

२०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला होता. या मतचोरीच्या आरोपांवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मतचोरीच्या आरोपांवर बोलताना अजित पवार यांनी बारामतीचं उदाहरण दिलं.

बारामतीत लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला ४८ हजार कमी मते मिळाली. मी बारामतीचं प्रतिनिधित्व करत असून आमदार आहे. पण पाच महिन्यांच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याच मतदारांनी मला १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून दिले. त्यावेळी मी स्वीकारलं की ४८ हजार मते आमच्या मतदाराला कमी मिळाली कारण लोकांनी तसं मतदान केलं. नंतर मी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो तर मी काय तिथं चुकीचं काही केलं का? तिथं काय गडबड केली का? असं काही नाही. काही लोकांना यश मिळत नाही त्यामुळं ते असं काही ना काही आरोप करतात.

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याची विचारणाही माध्यमांच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर मी आधीच सांगितलं की संविधान आणि कायद्यानुसार ज्याला प्रश्न उपस्थित करायचे आहेत तो करू शकतो. उत्तर देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

एका पत्त्यावर शंभर शंभर मतदान ओळखपत्र...

निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे. तो जो आरोप चुकीचा आहे की बरोबर आहे, ते तपासायला हवे. जर काही चुकीचे असेल तर त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. बरोबर असेल तर तसं त्यांनी स्पष्ट सांगितले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

India : पाण्यावर तरंगतंय संपूर्ण गाव! निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहून व्हाल थक्क

Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

SCROLL FOR NEXT