Maharashtra Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shocking : बाप की हैवान! पोटच्या ६ वर्षाच्या मुलाची हत्या करून नदीत फेकलं; धक्कादायक कारण समोर

Satara Karad News : साताऱ्यातील कराडमध्ये बापानेच ६ वर्षांच्या मुलाची हत्या करून मृतदेह कृष्णा नदीत फेकला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू.

Alisha Khedekar

  • कराडमध्ये बापाने मुलाची हत्या

  • पितृत्वावर संशयातून घडला प्रकार

  • मृतदेह कृष्णा नदीत फेकला

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • परिसरात संतापाचे वातावरण

साताऱ्यातील कराडमध्ये एका निर्दयी बापाने आपल्याचं पोटच्या मुलाला ६ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी बापाला त्याच्या मित्रांनी तुझा मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही म्हणून डिवचल्याने त्याने मुलाला संपवलं असल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर या नराधम बापाने मुलाचा मृतदेह कृष्णा नदीत फेकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर परिसरात कृष्णा नदीच्या काठावर एका निष्पाप मुलाचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी वेगाने तपास करायला सुरुवात केली.

पोलीस तपासात असे आढळून आले की, नदीकाठी सापडलेला मृतदेह हा ६ वर्षीय सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरेकारी याचा आहे. ६ वर्षांचा सिद्धार्थ कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील नागठाणे गावचा रहिवासी आहे. तो त्याच्या कुटुंबीयायांसमवेत रहात होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली असता सिद्धार्थच्या वडिलांच्या उत्तरांमध्ये तफावत जाणवली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक सखोल चौकशी केली.

या चौकशीत असे उघडकीस आले की, आरोपीला त्याच्या मुलाबद्दल शंका होती. त्याचे मित्र त्याला डिवचायचे. तो मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही, तो तुझा मुलगा नसावा, असे सारखे हिणवायचे. हे विचार सतत त्याच्या मनात घोळत राहायचे. त्यानंतर त्याला त्याची पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर शंका येऊ लागली. यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्यामध्ये सतत वाद व्हायचा.

१६ मार्च रोजी त्याने आपल्या मुलाला शाळेत घेऊन जात असल्याचे पत्नीला खोटे सांगितले आणि घराबाहेर पडला. मुलाला नवीन कपडे घेतले आणि त्याला घालायला भाग पाडलं. त्याने विजयपूरहून कराड तालुक्यातील उमराजपर्यंत आणि त्यानंतर शिवदे गावाजवळील कृष्णा नदीच्या निर्जन काठापर्यंत प्रवास केला. वाटेत त्याने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह कृष्णा नदीत फेकला आणि काहीही घडलं नाही असं दाखवत घरी परतला. मात्र त्याची एक चूक त्याला नडली आणि तो पोलिसांच्या तडाख्यात सापडला. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एक गाव एक भीम जयंतीचा नागरिकांचा संकल्प

Maharashtra Politics: महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेल्या महिला नेत्याची वर्णी लागणार

माझ्या बदनामीसाठी कट, खरात प्रकरणावर रुपाली चाकणकरांची भलीमोठी पोस्ट

Petrol-Diesel Price: टेन्शन वाढणार! पेट्रोल १८ रुपये, डिझेल ३५ रुपयांनी महागणार

Shocking : कंपनीच्या बॉयलरचा स्फोट; १० कामगारांचा होरपळून मृत्यू, ४० जखमी

SCROLL FOR NEXT