Maharashtra Crime News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Crime News: मुंबईसह नाशिक, अहमदनगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; ६ जणांना अटक, महाराष्ट्रात चाललंय तरी काय?

Crime News: पाकिस्तान जिंदाबाद, तसेच अन्य काही अक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्यात. अशा एकून सहा जणांना विविधल ठिकाणांवरुन अटक करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra News: भारतात काल स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. पाकिस्तानमध्ये दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. अशात राज्यात पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी काहींनी आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. पाकिस्तान जिंदाबाद, तसेच अन्य काही अक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्यात. अशा एकून सहा जणांना विविध ठिकाणांवरुन अटक करण्यात आली आहे. (Latest Crime News)

अहमदनगरमधून तिघांना अटक

अहमदनगरच्या भुईकोट किल्ला परिसरात पाच मुलांकडून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली आहे. लष्करी जवानांकडून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच मुलांच्या टोळक्याने "ना रहे तकदीर अल्लाहू अकबर, भारत तेरे तुकडे तुकडे होंगे, इन्शा अल्लाह" असे नारे दिलेत.

यानंतर या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातील दोन मुलांना भिंगार कॅम्प पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तिघांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. भिंगार कॅम्प पोलिसात सार्वजनिक एकोप्याला बाधा ठरतील अशा घोषणा दिल्याबाबत रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली होती.

कुलाब्यातून २ जण ताब्यात

कुलाब्यात देखील असाचा काहीसा प्रकार समोर आलाय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. कुलाबा मार्केटमधील एका व्यापाऱ्याने याबाबतची तक्रार नोंदवली. त्यानंतर याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. कुलाबा पोलिसांनी दोन १९ वर्षीय तरुणांना अटक केलीये. १४ ऑगस्ट रोजी या मुलांनी इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी ठेवली होती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नाशिकमधून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला अटक

नाशकात देखील १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. नाशिकचा चांदवड टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गुन्हा दखल करण्याचे आदेश दिले होते. शहादाब शौकत कुरेशी असं गुन्हा दाखल झालेल्या आणि घोषणा देणाऱ्या संशयित युवकाचं नाव आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या युवकावर १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT