Boiser Crime News : घातापाताचा डाव पोलिसांनी लावला उधळून; २ पिस्तुल अन् ५ काडतुसांसह दोघांना अटक

Kandivali Crime News : देशी बनावटीचे बंदुक आणि पाच जिवंत काडतुसांसह दोन जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 11 ने अटक केली आहे.
Boiser Crime News
Boiser Crime News Saam Tv

Crime News : देशी बनावटीचे बंदुक आणि पाच जिवंत काडतुसांसह दोन जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 11 ने अटक केली आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी केली असता हे दोघेही देशी बनावटीचे बंदुक विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाली.

निलेश व अमुल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी हे देशी बंदुक कुठून आणि कुणासाठी आणले याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Boiser Crime News
Earthquake In Satara, Sangli, Kolhapur : पाटणसह सांगली काेल्हापूरला भूकंपाचा धक्का, काेयना धरण सुरक्षित

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील बोईसर जिमखाना जवळील राजीव गांधी उद्यान परिसरात निलेश आणि अमोल नावाचे दोन व्यक्ती देशी बनावटीची बंदुक विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष युनिट 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना मिळाली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून दोन पंचासमक्ष संशयीतांची झडती घेतली. या झडतीत दोघांच्याही कमरेला खवलेले दोन देशी बंदुक आणि पाच जिवंत काडतूसे आढळून आली. या दोन्हीही आरोपींकडे शस्त्रे बाळगण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना नव्हता. त्यांनी हे दोन्हीही शस्त्र धुळे येथून आणली असल्याचे पोलिसांना सांगितले.

Boiser Crime News
Maharashtra Political News : शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळणार? विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

या दोन्ही आरोपी विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात कलम ३, २५ हत्यार कायदा सह कलम ३७ (१) (अ) सह कलम १३५ मपोका प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास हा कक्ष - ११, गुन्हे शाखा करीत आहे.

ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनायक चव्हाण यांच्या निर्देशनाखाली पोलिस निरिक्षक घोणे, सह पोलिस निरिक्षक जाधव , विशाल पाटील, कांबळे, पोलिस हवालदार रावराणे, खताते, खांडेकर, पोलिस शिपाई देशमुख यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com