Maharashtra Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Crime News: महाराष्ट्र-गुजरात सीमेवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; सात ट्रक, ४००० गोणी गुटखा जप्त

Maharashtra Crime News: मुंबई गुन्हे शाखे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरून मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई केली असून तब्बल सहा ट्रकमधील ४००० गोणी गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Crime News

मुंबई गुन्हे शाखे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरून मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई केली असून तब्बल सहा ट्रकमधील ४००० गोणी गुटखा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत अंदाजे १०.३२ कोटी रुपये आहे. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एन्काउंटर स्पोशलिस्ट दया नायक यांच्या नेतृ्त्वात कारवाई करण्यात आली असून हा गुटख्याची अवैधरित्या गुजरातमधून मुंबईत वाहतूक होत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरोडेखोरांच्या टोळीला पालघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील बँक ऑफ बडोदावर २०१७ मध्ये भुयारी मार्गे धाडसी दरोड्या टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. रात्रीच्या सुमारास संशयास्पद गाडीचे नंबर प्लेट बदलताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे तिघही सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं. यामध्ये मुख्य आरोपीवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे तब्बल 44 गुन्हे दाखल असून घरफोडी करताना या दरोडेखोरांकडून सशस्त्र दरोडा टाकला जायचा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नाआधी जन्मलेल्या बाळाची निर्घृण हत्या

गडचिरोलीतून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. आठ दिवसांवर लग्न ठरलेले असताना लग्नाआधी जन्मलेल्या बाळामुळे आपली बदनामी होईल, या भीतीने जन्मदातीनेच अर्भकाचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना आहे. गडचिरोली शहरात हा प्रकार घडला आहे. या युवतीला गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

SCROLL FOR NEXT