Maharashtra Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: खुनांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! जालना, नाशिकसह पिंपरी चिंचवडमध्ये तिघांची हत्या; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Priya More

हत्याकांडाच्या वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. जालना, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हत्याकांडाच्या या घटना घडल्या आहेत. जालनामध्ये एका हॉटेलच्या खोलीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिकच्या पंचवटीमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दगडाने ठेचून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

जालना -

जालना शहरानजीकच्या जामवाडी येथे एका हॉटेलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतर हॉटेलजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला. दरम्यान हत्येच्या या घटनेतील संशयित आरोपीच्या घरी कन्हैयानगर भागात तोडफोड आणि जाळपोळ झाल्यामुळे या ठिकाणी देखील पोलिसांनी मध्यरात्री गस्त घालून या ठिकाणी देखील मोठा फौज फाटा तैनात केला. दरम्यान हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी या प्रकरणात ४ संशयितांना अटक केली आहे.

नाशिक -

नाशिकच्या पंचवटी करंज्या परिसरात रात्री १२ वाजता एका तरुणाची हत्या करण्यात आली. खूनाच्या घटनेने नाशिक पुन्हा हादरले आहे. गणेश उत्सवाच्या काळात खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अतुल सूर्यवंशी या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पूर्व वैमन्यासतुन हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पिंपरी चिंचवड -

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरामध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. अली अन्सारी या ३५ वर्षांच्या तरुणांची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केली. काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळील फुटपाथवर सकाळी अली अन्सारी या तरुणाचा मृतदेह आढळून आला. अली अन्सारी नेमका कोण आहे? तो कुठला रहिवासी आहे? त्याची अज्ञात व्यक्तीने हत्या का केली? याचा तपास सध्या वाकड पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT