BJP and Shiv Sena (Shinde faction) leaders amid rising tensions over Mahayuti alliance in Sambhajinagar. saam tv
महाराष्ट्र

Corporation Election: संभाजीनगरमध्ये रंगला महायुतीचा आखाडा; युतीतील बिघाडी उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर?

Sambhajinagar Corporation Election: महायुतीच्या एकीचं गाणं गायलं जात असताना संभाजीनगरमध्ये मात्र महायुतीतच आखाडा रंगलाय. एकमेकांवर टोकाचे आरोप केले जात आहेत. मात्र हा आखाडा का रंगलाय. आणि संभाजीनगरमध्ये महायुतीचा पोपट का मेला? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • संभाजीनगरमध्ये महायुतीत उघड उघड वाद

  • भाजप-शिंदेसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप

  • जागावाटपावरून युती अखेर तुटली

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासापर्यंत चाललेली शिंदेसेना- भाजपची चर्चा अखेर फिस्कटली आणि अखेर महायुती तुटल्याची अधिकृत घोषणाच शिंदेसेनेनं केलीय. एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीत जास्त जागा मिळाल्याच्या अहंकार आणि हट्टामुळेच भाजपनं युती तोडल्याचा आरोप शिंदेसेनेनं केलाय. तर भाजपनं मात्र युती तोडण्याचं खापर शिंदेसेनेवर फोडलंय.

खरंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 115 जागा आहेत. याच जागांसाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या 10 बैठका झाल्या.. मात्र अखेर या बैठकांतून काहीच हाती आलं नाही त्याला कारण ठरलंय भाजपनं शिंदेसेनेला दिलेला जागावाटपचा प्रस्ताव. नेमका प्रस्ताव काय होता? पाहूयात.

शिंदेसेनेकडून भाजपकडे 45 जागांची मागणी

भाजपकडून शिंदेसेनेला केवळ 37 जागांचा प्रस्ताव

प्रस्ताव मान्य न झाल्यानं पुन्हा बैठका

बैठकीत शिंदेसेनेच्या माजी उपमहापौराला डावलण्यात आलं

याच प्रस्तावामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी थेट कार्यकर्त्यांसह शिरसाटांची भेट घेत युती तोडण्याची मागणी केली. खरंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये इतकी मोठी रस्सीखेच सुरु असली तरी नेमकं महापालिकेत कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ होतं. पाहूयात. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 115 पैकी शिवसेना 29, एमआयएम 25, भाजप, 22, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 4, बसपा 2 तर इतर 23 निवडून आले होते. त्यातील 29 पैकी 22 माजी नगरसेवक सध्या शिंदेसेनेसोबत आहेत.

गेल्या निवडणुकीत शिंदेसेनेचं संख्याबळ जास्त असतानाही भाजपनं शिंदेसेनेला केवळ 37 जागांचाच प्रस्ताव दिला. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. आता एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत..याच अंतर्गत वादामुळे महायुतीला फटका बसण्याची आणि ठाकरेसेना मुसंडी मारण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEST Bus Accident : भावाचं लग्न आटोपून वर्षा घरी निघाली, पण वाटेतच काळाचा घाला; बेस्ट बसने चिरडल्याने नर्सचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पनवेल आणि नवी मुंबईच्या फार्म हाऊस वर पोलिसांची नजर

Jaggery-peanuts Benefits: हिवाळ्यात गुळ-शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे

Gold Price : सोनं प्रति तोळा ५८००० रूपयांनी वाढले, वाचा वर्षभरात गोल्ड रेट कसे बदलले

Suniel Shetty: सुशांतनंतर, कार्तिक आर्यनविरुद्ध बॉलिवूडचा काही अजेंडा आहे का? सुनील शेट्टीने दिला इशारा

SCROLL FOR NEXT