Saam TV Impact Saam tv
महाराष्ट्र

Saam TV Impact: दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक, 'साम'च्या बातमीनंतर वसमत बाजार समिती प्रशासनावर कारवाई

Saam TV Impact: बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात सहकार विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे.

संदीप नांगरे

Hingoli News:

तुम्ही ग्राहकाची एखाद्या डिलिव्हरी बॉय किंवा डिजिटल वेबसाईटने फसवणूक केलेली पाहिली असेल, मात्र हिंगोलीत चक्क शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस झाले आहे. ही फसवणूक महाराष्ट्रात नावाजलेली बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व आडत व्यापाऱ्यांनी केली आहे.

बाजार समितीने फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांची व्यथा साम टीव्हीने दाखवली. त्यानंतर आता या बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात सहकार विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून कागदपत्रांची छाननी करणारा हा शेतकरी वाशिम जिल्ह्यातील खडीधामणी गावातील रहिवासी आहे. विशाल रामराव चोपडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दहातोंडे यांनी आपल्या शेतात काबाडकष्ट करून अकरा महिन्यांमध्ये हळदीचे चांगले उत्पादन घेतलं.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतातील हळद काढणी झाल्यानंतर राज्यभरात हळदीला चांगला भाव देणाऱ्या बाजारपेठांची शोधाशोध केली. दहातोंडे यांना हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला भाव मिळतोय, अशी माहिती मिळाली.

दहातोंडे यांनी लागलीच आपल्या इतर सहकारी शेतकरी मित्रांना घेऊन बाजार समितीमध्ये हळद विक्रीला आणली. हळदीला चांगला भाव देऊन हळद विक्री झाल्यानंतर पुढे या शेतकऱ्यांसोबत धक्कादायक प्रकार घडला.

पुढे लेकराप्रमाणे जोपासलेली शेतातली हळद विक्री करून, रब्बी हंगामाची पेरणी करायची होती. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबातील प्रत्येकाला कपड्यांची खरेदी करायची होती. मात्र हे सगळं सोडून बाजार समितीने फसवणूक केल्यामुळे हे शेतकरी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिनाभरापासून पैसे मिळण्यासाठी चकरा मारत आहेत.

नावाजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एवढा मोठा गंभीर प्रकार घडला. या बाजार समितीवर सत्ता असलेल्या वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मात्र या प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा आरोप हा फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

बाजार समितीतील प्रशासन सभापती व बाजार समिती ताब्यात असलेल्या आमदार महोत यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण व आत्मदहन करणार असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं.

'साम'च्या बातमीनंतर कारवाई

मात्र, या सर्व शेतकऱ्यांची व्यथा आज सकाळी साम टीव्हीने दाखवली. त्यानंतर हिंगोलीच्या सहकारी भागातील अधिकारी खडबडून जागे झाले, बाजार समिती प्रशासनावर अंकुश असणाऱ्या जिल्हा उपनिबंधक संजय बोराडे यांनी तातडीने चौकशी समितीने मत बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT