Govardhan Sharma Death: भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Govardhan Sharma Death: भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे ७४ व्या वर्षी निधन झालं.
Govardhan Sharma Death
Govardhan Sharma DeathSaam tv
Published On

Govardhan Sharma Death :

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे ७४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोग या आजाराशी झुंज देत होते. आज शुक्रवारी आमदार गोवर्धन शर्मा यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. ७४ व्या वर्षी आमदार गोवर्धन शर्मा यांची प्राणज्योत मालवली. शर्मा हे अकोला पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. गोवर्धन शर्मा हे गेल्या पाच टर्मपासून भाजपचे आमदार होते. (Latest Marathi News)

अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. गोवर्धन शर्मा हे गेल्या पाच टर्मपासून भाजपचे आमदार होते. गोवर्धन हे नितीन गडकरी यांच्या जवळचे नेते मानले जायचे.

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने गोवर्धन कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळला आहे. गोवर्धन शर्मा यांच्या पश्च्यात दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी गंगादेवी शर्मा असा परिवार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Govardhan Sharma Death
Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा द्या', भाजप आमदाराची मागणी

सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असणारे अशी अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांची ख्याती होती. गोवर्धन शर्मा हे गोपीनाथजी मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, प्रमिला टोपले, वसंतराव देशमुख, संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

Govardhan Sharma Death
ED News: महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे CM बघेल यांना दिले 508 कोटी, ED चा दावा

रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील नेते म्हणून त्यांना नावाजलं जायचं. त्यांच्या निधनाने पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे आमदार शर्मा यांच्यावर अकोला शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यावर उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून बस स्थानक, गांधी रोड,सिटी कोतवाली मार्गे निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com