ED News: महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे CM बघेल यांना दिले 508 कोटी, ED चा दावा

ED On Bhupesh Baghel: महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे CM भूपेश बघेल यांना दिले 508 कोटी, ED चा दावा
ED On Bhupesh Baghel
ED On Bhupesh BaghelSaam Tv
Published On

ED On Bhupesh Baghel:

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये ईडीने आज असीम दास याला 5 कोटींहून अधिक रोख रकमेसह अटक केली आहे.

या कारवाईनंतर ईडीने दावा केला आहे की, महादेव बॅटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी आतापर्यंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिले आहेत. याबाबत असीम दास याने माहिती दिली असल्याचा दावा ईडीने केला आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ED On Bhupesh Baghel
Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा द्या', भाजप आमदाराची मागणी

असीम दास याच्याकडून 5.39 कोटी रुपये जप्त केल्यानंतर ईडीने त्याला अटक केली आहे. ईडी महादेव ऑनलाइन सट्टेबाजी अॅप आणि त्याच्या प्रवर्तकांची मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत चौकशी करत आहे. (Latest Marathi News)

ED On Bhupesh Baghel
Chhattisgarh BJP Manifesto: प्रत्येक विवाहित महिलेला 12000 रुपये मिळणार, भाजपने जाहीरनाम्यात केली घोषणा

"असीम दासची चौकशी, त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी आणि महादेव नेटवर्कमधील एक प्रमुख आरोपी शुभम सोनी याने पाठवलेल्या ईमेलच्या तपासणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियमित पेमेंट केले गेले आहे आणि आतापर्यंत महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सुमारे 508 कोटी रुपये दिले आहेत,'' असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com