Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: आज राज्यभरात आढळले नवीन ८३ रुग्ण; पुण्यात वाढला कोरोना रुग्णांचा आकडा

Bharat Jadhav

Maharashtra Corona Update:

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला असून यात आज नवीन ८३ रुग्णांची भर पडली. या आकडेवारीनुसार, सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा ७०५ वर पोहोचलाय. त्याचबरोबर कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-१च्या रुग्णातही वाढ होत असून ही संख्या २५० वर पोहोचलीय. सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात आढळून आलीय. (Latest News)

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मेट्रो शहरात जेएन-१ कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर नागपूरमध्ये ३०, मुंबई -२२, सोलापूर ९ अशी संख्या आज आढळलीय. राज्यातील सक्रीय रुग्ण मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १५५, ठाणे- ३,ठाणे मनपा-७३, नवी मुंबई मनपा-७९, कल्याण डोंबिवली मनपा-१६ असे रुग्ण आढळून आले आहेत. \

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ जानेवारी २०२३ पासून ते आतापर्यंत १४३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यापैकी ७१.३३ टक्के रुग्ण हे ६० वर्षावरील आहेत, तर ८५ टक्के लोकांना इतर आजारदेखील होते. तर मृत पावलेल्या १५ टक्के लोकांना कोरोनाने ग्रासले होते. आज राज्यात १२,९१७ कोविड चाचण्या झाल्या.त्यात आरटी-पीसीआर चाचण्या २५०९ आणि आरएटी चाचण्या १०,४०८ झाल्या असून आज पॉझिटीव्हीटी रेट ०.६६ टक्के होता.

कालच्या आकडेवारीनुसार ७७३ रुग सक्रीय होते. कोरोनाबाधित रुग्णांमधील ७२८ जणांना ग्रह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर ४५ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील २४ जणांना अतिदक्षता विभागात ठेवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT