Maharashtra Corona Update:  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाच्या रुग्णात घट, गेल्या २४ तासांत ३५ नव्या रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

corona cases in Maharashtra: राज्यात आज सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. आज सोमवारी ३५ नव्या रुग्णांची भर पडली. तर राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१च्या रुग्णांची संख्या २५० वर पोहोचली आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Maharashta Corona Update:

राज्यात आज सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. आज सोमवारी राज्यात ३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१च्या रुग्णांची संख्या २५० वर पोहोचली आहे. पुण्यात जेएन-१च्या रुग्णांची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. (Latest Marathi News)

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१ ने नागरिकांची चिंता वाढवली आहे. पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर नागपूरमध्ये ३०, मुंबई -२२ अशी रुग्णसंख्या आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात गेल्या २४ तासांत ३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात नवी मुंबई, पुणे आणि सांगलीमध्ये प्रत्येकी १ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातही कोरोना रुग्णांची घट

देशात गेल्या ५ आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. देशात गेल्या सात दिवसांच्या तुलनेत मागील शनिवारी कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांची घट पाहायला मिळाली. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. तर त्याआधीच्या आठवड्यात कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता.

देशात जानेवारीच्या (7-13 ) दिवसांत ३६२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर त्या आधीच्या आठवड्यात देशात ४, ८६२ रुग्णांची झाली होती. देशातील काही राज्यातही कोरोनाच्या रुग्णात घट पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT