nana patole  Saam TV
महाराष्ट्र

Congress News: नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये एकजूट, दिल्लीत हालचालींना वेग

Nana Patole Vs Balasaheb Thorat: राज्यात बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले वाद सुरू असताना महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्ली वारी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीव आक्षेप घेत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा विरोध केला आहे. या प्रकरणी दिल्लीत वरिष्ठ पातळी देखील हालचाली सुरु झाल्या आहेत.

राज्यात बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले वाद सुरू असताना महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्ली वारी केली आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार,अमर राजूरकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी राज्यातील काँग्रेसच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. अशोक चव्हाण समर्थक नेते दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत.

त्यामुळे दिल्लीत कॉंग्रेस नेत्यांची नाना पटोले हटाव मोहीम सुरु असल्याचं बोललं जात आहे. नागपूर विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाना पटोले आणि विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष झाला आहे. सुधाकर आडबोले यांच्याऐवजी नाना पटोलेंनी दुसऱ्याच उमेदवाराचे नाव समोर केले होते.

सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी या नेत्यांनी आडबोले यांचे नाव जाहीर केली. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांच्या विरोधातील मोहिम सुरु झाली आहे.  (Latest Marathi News)

नाना पटोले यांच्या विरोधात अशोक चव्हाण, विदर्भातील नेते, बाळासाहेब थोरात एकवटल्याची राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. दिल्लीतील भेटीगाठींमुळे नाना पटोले यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील 'या' लोकेशन्सवर भन्नाट फोटो काढू शकता; फिरण्यासोबत फोटोशूटही करा

Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Train Updates : मुंबई लातूर व्हाया मुरुड! कधी-कुठे आणि किती वाजता निघणार हॉलिडे ट्रेन

Maharashtra Live News Update: तुळजापूरमध्ये हजारो च्या संख्येने बंजारा समाज एकवटला

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी जीव दिलेल्या ९० कुटुंबांना शिंदे गटाच्या 'या' आमदारकडून मोठी मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT