Villagers gather around a bonfire as dense fog and freezing temperatures grip Maharashtra during an intense cold wave. Saam Tv
महाराष्ट्र

Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात पुढील २ दिवस हाडं गोठवणारी थंडी, हवामान खात्याचा अलर्ट

Cold Wave Tightens Grip: राज्यात थंडीची लाट पसरलीय... अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सियसच्या खाली गेलयं... मात्र हवामान विभागानं काय इशारा दिलाय? राज्यात थंडी का वाढली? ही कडाक्याची थंडी राज्यातील कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे?

Suprim Maskar

शेकोटीच्या धगीला कोंडाळा करून बसलेले माणसांचे घोळके आणि सकाळच्या वेळेस पसरलेली धुक्याची चादर... राज्यात थंडीचा कडाका वाढू लागल्याचं हे चित्र.. गुलाबी थंडीच्या चाहूलीनं महाराष्ट्राला एकच हुडहुडी भरलीय...महाबळेश्वरपेक्षा अहिल्यानगर जास्त थंड आहे.अशातच हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा अजून घसरणार .असं जाहीर केलं...

राज्यात थंडीचा कहर

अहिल्यानगर - 7.4 अंश

जळगाव - 8.4 अंश

गोंदिया - 8.6 अंश

नागपूर - 8.8 अंश

पुणे - 8.9 अंश

यवतमाळ - 9.2 अंश

नाशिक - 9.3 अंश

अकोला - 10.6 अंश

छ. संभाजीनगर - 11 अंश

चंद्रपूर - 11.6 अंश

धाराशिव - 12 अंश

उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे... त्यातच थंडीने आपले ‘तेवर’ दाखवायला सुरुवात करताच, उबदार कपड्यांचा बाजारही आता गुलजार झालाय.. स्वेटर, मफलरची मागणी वाढलीय.. आता तुम्ही ही या गुलाबी थंडीचा आनंद घेताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला ही विसरू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Station : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका! 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर उभारणार एलिव्हेटेड डेक; जाणून घ्या

Maheshwari Saree Fashion: मिथिलाने नेसलेली महेश्वरी साडीचा ट्रेंड करा फॉलो; लग्नात सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

Ayesha Khan: 'धुरंधर' चित्रपटातील 'शरारत' गाण्यामुळे चर्चेत आलेली आयेशा खान कोण?

Warm Water Benefits: सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने 'हे' आजार होतात दूर

Maharashtra Live News Update: आयटी पार्क हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT