Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE Updates Maharashtra CM News  Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE Updates Maharashtra CM News
महाराष्ट्र

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates: राज्य सरकारचा शपथविधी पार पडताच सोलापुरात EVMविरोधात आंदोलन

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातली दिग्गज नेते उपस्थिती लावणार आहेत. बुधवारी, भाजप आमदारांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड केली. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

Namdeo Kumbhar

राज्य सरकारचा शपथविधी पार पडताच सोलापुरात EVMविरोधात आंदोलन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापुरात evm विरोधात घेण्यात आली स्वाक्षरी मोहीम. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरु असणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग. मारकडवाडीमध्ये इव्हीएमविरोधात बॅलेटपेपरवर फेरमतदान घेण्यासाठी आग्रही असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांनी घेतला आंदोलनात सहभाग घेतला.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

नव्या सरकारची पहिलीच पत्रकार परिषद पार पडत आहे. कॅबिनेटनंतर पत्रकार परिषद पार पडत आहे.

Pune Accident : पुण्यात विचित्र अपघात, भरधाव कार चालकाची काही वाहनांना धडक

पुण्यात सुस पाषाण रोडवर अपघात

एका वाहन चालकाने काही गाड्यांना धडक दिल्याची माहिती

संतप्त जमावाने गाडीची केली तोडफोड

चार ते पाच वाहनांना दिली धडक

पोलीस घटनास्थळी दाखल

Mahayuti : महायुती सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात

महायुती सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला उपस्थित आहेत. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Devendra Fadnavis : नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात पोहोचले

नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात पोहोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत दोन्ही नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा मंत्रालयात पोहचले.मंत्रालयात तिन्ही जणांचे औक्षण करण्यात आले. तिन्ही नेत्यांवर करण्यात गुलाबांचा वर्षाव करण्यात आला. तिन्ही नेते महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुढील कार्याला सुरुवात करणार आहेत.

Maharashtra Politics : महायुती सरकारची शपथविधीनंतर पहिलीच पत्रकार परिषद 

महायुती सरकारची शपथविधीनंतर पहिलीच पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषद तिन्ही नेते काय बोलणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरचा बायो बदलला 

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरचा बायो बदलला आहे. त्यांच्या ट्विटर बायोवर आता उपमुख्यमंत्री असा उल्लेख पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री, भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष 

देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.

यामुळे साईनगरीत जल्लोष पाहायला मिळत आहे.

शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे फोटो झळकवत घोषणाबाजी करण्यात आली.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानाला रोषणाई

देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानाला रोषणाई करण्यात आली आहे.

घरासमोर रस्त्यावर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली..

देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोबत मंचावर आले , थोड्याच वेळात सोहळ्याला सुरुवात होणार

मुख्यमंत्रिपदाच्याच शपथविधीसाठी बॉलिवूडकरांची हजेरी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी बॉलिवूडकरांनी हजेरी लावलीय.

देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लगेच पदभार स्वीकारणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दालनात येतील, त्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट करण्यात आलीय.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला

शपथविधीसाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. दरम्यान या सोहळ्यासाठी मुंबई बाहेर वाहने आली असल्याने शहरातील ट्रफिक वाढलंय. वाहतूक कोंडीचा फटका काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना बसलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईला पोहोचणार

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईला पोहोचतील.

शपथविधी सोहळा कार्यक्रमाला अभिनेता रणवीर सिंहची हजेरी

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावलीय.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काही वेळातच सह्याद्री अतिथगृहावर दाखल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे येणार आहेत. थोड्याच वेळात ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होणार आहेत.

Maha Vikas Aghadi: एकीकडे महायुतीचा शपथविधी तर दुसरीकडे महाविकासआघाडीच आंदोलन

एकीकडे महायुतीचा शपथविधी तर दुसरीकडे महाविकासआघाडीच आंदोलन

महाविकास आघाडीचे ईव्हीएम विरोधात आंदोलन

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

शपथविधी सोहळ्यादिवशीच पुण्यातील विधानभवना बाहेर महाविकास आघाडीचं आंदोलन

सुषमा अंधारे, मोहनदादा जोशी, प्रशांत जगताप आणि महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवारांच ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन

पत्र घेऊन शिवसेना नेते राजभवनावर दाखल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असं उदय सामंत म्हणाले.

Girish Mahajan : गिरीश महाजन वर्षावर दाखल

गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

शिंदे नाराज नाहीत असे गिरीश महाजन म्हणाले.

शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असेही महाजन म्हणाले.

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसे पत्र थोड्याच वेळात राजभवनवर जणार आहे.

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडून शिंदेंना आग्रह

संदिपान भुमरे, शंभूराजे देसाई, दादा भुसे वर्षावर पोहोचले

वर्षा बंगल्यावर गुलाबराव पाटील राहुल शेवाळे व इतर आमदार पोहोचले

शिवसेनेचे प्रमुख आमदार - खासदार वर्षा वर पोहोचले. सर्वजण एकनाथ शिंदे यांना विनंती करीत आहेत.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील - गुलाबराव पाटील

काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची साम टीव्ही ला माहिती.

आणि सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी मान्य केलं की ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

तर गृहखातं शिंदे साहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी

गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली भूमिका

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : उपमुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेनेचा सस्पेन्स अजूनही कायम

शपथविधीला अवघे तीन तास उरले असताना शिवसेनेच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह?

निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार असा उल्लेख नसल्याने सस्पेन्स कायम ?

राष्ट्रवादी काॅग्रेसच्या पत्रिकेत अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा उल्लेख

जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही. महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी.
संभाजीराजे छत्रपती
संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यावी अशी आमची सर्वांची भूमिका आहे. त्याला ते सहमत आहेत, अशी आम्हाला खात्री आहे.
उदय सामंत

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : शपथविधीला अवघे काही तास उरले आहेत आणि याच निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर गोमाते चे पूजन केलं. सागर बंगल्यावर फडणवीस यांच्यासाठी शिरूर आणि उल्हासनगर या ठिकाणाहून २ गोमाता दाखल झाल्या होत्या. यावेळी फडणवीस यांनी या दोन्ही गोमातेचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका

शपथविधी पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नावाचा उल्लेख.. शपथविधीच्या पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव गायब

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates : राज्याचे नावनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजीत पवार हे पदाचा अधिभार घेतल्यावर प्रथेनुसार ठिक 6.30 वाजता पत्रकार कक्षास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधतील.

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : महायुतीच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी खास टिशर्ट

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : महायुतीच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी खास टिशर्ट

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : मंत्रिमंडळाचा विस्तार ११ डिसेंबर रोजी, भरत गोगावले यांची माहिती

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates :  अहिल्यानगर :  महायुतीच्या शपथविधीसाठी भाजपचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडत आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यासाठी राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केल्याचं पाहायला मिळत आहे अहिल्यानगर येथून सुमारे दीडशे ते दोनशे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates : अमित शाह दुपारी ३.३० वाजता भाजप नेत्यांना भेटणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी ३.३० वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पोहचणार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यापूर्वी अमित शहा भाजप नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Winter Session News: हिवाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी?| Marathi News

आज केवळ ३ जणांचा शपथविधी होईल, असं कळत आहे. अजित दादांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येकालाच इच्छा असते दादांचा मूड चांगला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वाचावरण आहे.
संजय काका पाटील
महाराष्ट्राला पून्हा १ नंबरवर आणणार आहोत. आमच्या वचननाम्यातील सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. राज्यपालांकडे शपथ कोण कोण घेणार हे कळवलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत. सर्वांना सरकारने नियमानुसार निमंत्रण दिलंय. देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोलले आहेत. उद्धवजी पवारजी सर्वांना विनंती आहे महाराष्ट्राच्या विकसासाठी यावं. मी देखील विनंती करतो काँग्रेसचे नाना पटोले, उद्धवजी पवारसाहेब , राज ठाकरे सर्वांनी यावे.
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : उध्दव ठाकरे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

उध्दव ठाकरे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळाले. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे १०० टक्के उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिम्मत त्यांच्यात अजिबात नाही. आज तिघे शपथ घेतील, बाकीच्या शपथविधीला अनेक वेळ जाईल.
संजय राऊत, शिवसेना(UBT)

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : आज तिघांचाच शपथविधी, नागपूर अधिवेशानआधी मंत्रिमंडळ विस्तार, अनिल पाटील यांची माहिती

आज केवळ तिघांचा शपथविधी होईल. ७ - ८ तारखेला विधानभवनात इतरांचे शपथविधी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती वेळासाठी उपलबद्ध आहेत.. त्यानुसार कार्यक्रम घेतला आहे.. बाकी नाराजीचा काही विषय नाही. संध्याकाळी कॅबिनेट होईल, त्यात पुढचे निर्णय होतील.

सध्या खातेवाटपाचा विषयच नाही, आधी मंत्रीपदी कोण येणार याचा निर्णय व्हायचाय. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे अनिल पाटील यांनी सांगितले.

Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE Updates : शपथविधी सोहळ्याला पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शपथविधी सोहळ्यासाठी किमान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त आणि २९ सहायक पोलिस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ५२० पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

सोहळ्यादरम्यान वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० इतर कर्मचारी यांचा समावेश असलेली टीम नियुक्त केली जाईल.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : फडणवीस यांच्या शपथविधीला नाशिकमधून सिख समुदायांना आमंत्रण 

नाशिक महाराष्ट्रातील सिख समुदायाला देखील आता महत्त्व दिले जात असून पुढील महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकींना नक्कीच याचा फायदा होईल.

भाजपाने काही दिवसापूर्वी सिख समुदायाची एक महाराष्ट्र लेवलची समन्वयक कमिटी स्थापन केली असून आता या सिख समुदायाला देखील आमंत्रण देण्यात आले आहे.

नाशिक मधून सिख समुदायाचे काही प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आलेला आहे व त्यांना पास देखील देण्यात आलेले आहे.

त्यामधील सिख समुदायाचे काही प्रतिनिधी या शपथविधीला उपस्थित राहणार असून 75 वर्षानंतर आम्हाला हा मान मिळत असल्याचे देखील सिख समुदायाचे प्रतिनिधी गुरुमुख सिंह संधू यांनी सागितले..

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : शपथविधीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाही निमंत्रण

Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE  : राजशिष्टाचारनुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

माजी मुख्यमंत्री असल्याने उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनाही आजच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE  : जितेंद्रनाथ महाराज यांना देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचे निमंत्रण

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थाटात होणार आहे, या शपथविधीसाठी साधू संतांना निमंत्रण पाठविण्यात आलेय..त्यामध्ये अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर श्री जितेंद्रनाथ महाराज यांना या शपथविधीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे, जितेंद्रनाथ महाराज यांना शपथविधीचं निमंत्रण मिळाल्यामुळे धार्मिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय...जितेंद्रनाथ महाराजांना यापूर्वी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला देखील प्रमुख म्हणून बोलवण्यात आलं होतं.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाशिकचे साधू महंत लावणार हजेरी

मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे... या रंगणार्‍या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

महायुतीच्या शपथविधीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, दत्ता भरणे, आशुतोष काळे आणि अनिल पाटील हे आमदार देखील देवगिरीवर पोहचले आहेच

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : बंजारा समाजाला मंत्रिमंडळात स्थान द्यावे 

राज्यात बंजारा समाजाचे कणखर नेतृत्व आ संजय राठोड करीत आहे.. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा समजाच्या वतीने विद्यमान आ संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे.. त्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराजाना समाजाच्या वतीने साकडे घालण्यात आले, यावेळी असंख्य बंजारा समाजाच्या महिला पुरुष यांनी संत सेवालाल महाराजाची पूजा करून प्रार्थना केली

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : राणाजगजितसिंह पाटील यांना मंञीपद मिळावे यासाठी शिराढोण ग्रामस्थांनी ढोणेश्वर मंदिरात केली आरती

तुळजापुरचे भाजपा आ.राणाजगजितसिंह पाटील यांना मंञीपद मिळावे यासाठी शिराढोण येथील ग्रामदैवत ढोणेश्वर मंदिरात गावकऱ्यांनी महाआरती करुन साकडे घातले दरम्यान जिल्ह्यातील भुमीपुञाला मंञी पद मिळावे व जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन निघावा यासाठी आरती करुन साकडे घालण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी सांगितले.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांची धाकधूक वाढली, कुणालाही फोन नाही

मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांची धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या तिघांसोबत इतर मंत्री शपथ घेतील का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेय. कोणत्याही आमदारांना अद्याप फोन आले नसल्यानं इतर मंत्रांचा शपथविधी होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

रात्री उशिरापर्यंत मंत्री पदासाठी इच्छुक असलेले आमदार तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांच्या बंगल्यावर ठाण होते. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार आपल्या परिवारासह मुंबईत दाखल झाले आहेत.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : "महाराष्ट्र आता थांबणार नाही", शपथ विधी सोहळ्याची वर्तमानपत्रांमध्ये भव्य जाहिरात

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची सर्व वर्तमानपत्रांमध्ये आज जाहिरात

जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा फोटो

भाजपकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

जाहिरातीवर महापुरुषांचे सुद्धा फोटो

भाजप चे वरिष्ठ नेत्यांचे सुद्धा जाहिरातीत फोटो

Maharashtra CM Oath Ceremony Live updates :

Maharashtra CM Oath Ceremony Live updates :  जय श्रीरामच्या घोषणा देत नाशिकहून साधू महंत मुबंईसाठी रवाना

जय श्रीरामच्या घोषणा देत नाशिकहून साधू महंत मुबंईसाठी रवाना झाले आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी नाशिकहून साधू महंत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात पार पडणार शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंतांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates :  आझाद मैदानाबाहेर शपथविधी सोहळ्याचा माहोल

महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात पार पडत आहे. अझाद मैदानाच्या बाहेर या शपथविधी सोहळ्याचा माहोल सकाळपासूनच पाहायला मिळतोय. या संपूर्ण परिसरात महायुतीत मधील घटक पक्षात पक्षांचे झेंडे, फ्लेक्स, बॅनर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्याचबरोबर भाजपचा पक्ष चिन्ह असलेल्या कमळ चेही बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात झळकवले आहे

Maharashtra CM Oath Ceremony Live updates :  शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील उच्च पदस्थ मंत्री मुंबईत येणार आहेत. आज, ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यातील शपथविधीसाठी अनेक केंद्रीय मंत्री लावणार उपस्थिती

अनेक राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला पावणार उपस्थिती

मोदींसह उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरात चे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थान चे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणा चे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी राहणार उपस्थितीत

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण कोण झालं?

1. यशवंतराव बळवंतराव चव्हण - 1 मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962

2. मारोतराव सांबशिव कन्नमवार -21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. परशुराम कृष्णाजी सावंत (हंगामी) 25 नोव्हेंबर 1963 ते 04 डिसेंबर 1963

4. वसंतराव फुलसिंग नाईक- 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975

5. शंकरवर भाऊराव चव्हाण - 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

6. वसंतराव बंडुजी पाटील - 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978

7. वसंतराव बंडुजी पाटील - 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978

8. शरदचंद्र गोविंदराव पवार -18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

9. अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले -9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

10. बाबासाहेब अनंतराव भोसले - 20 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

11. वसंतराव बंडूजी पाटील- 02 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985

12. वसंतराव बंडूजी पाटील- 10 मार्च 1985 ते 1 जून 1985

13. शिवाजीराव भाऊराव पाटील- निलंगेकर -03 जून 1985 ते 7 मर्च 1986

14. शंकरराव भाऊराव चव्हाण - 14 मार्च 1986 ते 24 जून 1988

15. शरदचंद्र गोविंदराव पवार -25 जून 1988 ते 3 मार्च 1990

16. शरदचंद्र गोविंदराव पवार -04 मार्च 1990 ते 25 जून 1991

17. सुधाकरराव राजूसिंग नाईक - 25 जून 1991 ते 23 फेब्रुवारी 1993

18. शरदचंद्र गोविंदराव पवार -06 मार्च 1993 ते 13 मार्च 1995

19. मनोहर गजानन जोशी -14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999

20. नारायण तातू राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

21. विलासराव दगडोजी देशमुख -18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

22. सुशिलकुमार संभाजीराव शिंदे - 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2004

23. विलासराव दगडोजीराव देशमुख -1 नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008

24. अशोक शंकरराव चव्हाण -8 डिसेंबर 2008 ते 8 नोव्हेंबर 2009

25.अशोक शंकरराव चव्हाण - 1 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2010

26. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण - 11 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014

27. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

28. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस - 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019

29.उद्धव बाळासाहेब ठाकरे - 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022

30. एकनाथ संभाजीराव शिंदे- 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024

Maharashtra CM Oath Ceremony Live updates :  फक्त ३ जणांचाच शपथविधी होणार?

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अशा तिघाचांच शपथविधी आज पार पडणार

महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर एकमत झाल्यानंतरच इतरांचे शपथ विधी होणार, सूत्रांची माहिती

Oath Ceremony News : शपथविधीसाठी वाहतुकीत बदल, या मार्गावरील वाहतूक बंद | Marathi News

Devendra Fadnavis oath ceremony Live : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर Devendra Fadnavis विराजमान होणार; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

Devendra Fadnavis oath ceremony Live : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्याने बंजारा समाज बांधवांचा जल्लोष

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी मोठा जल्लोष केला असून बंजारा तांड्यावर देवेंद्र फडणवीस यांचा जयघोष करत बंजारों का सन्मान सिर्फ देवा भाऊचा घोषणा देण्यात आल्या मोफत राशन , लाडकी बहीण योजनेचे पैसे यासोबतच बंजारा समाजासाठी केलेल्या कल्याणकारी योजनांमुळेच देवेंद्र फडणवीस पाहिजे असल्याच्या मत एवढी मंदार समाजाच्या महिलांनी व्यक्त केला आहे या सोबतच सरकारने जाहीर केलेल्या तांडा समृद्धी बंजारा समाज हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा पाठीशी खंबीर उभा असल्याचं मत बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी व्यक्त केलं

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : डॉ. बालाजी किणीकरांना मंत्रिपद मिळावं!

बालाजी किणीकर यांना मंत्रीपद मिळाल्यास अंबरनाथकरांना त्यांनी दिलेल्या मताधिक्याची पोचपावती मिळेल, असं सुनील चौधरी म्हणाले. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे अंबरनाथचे रहिवासी होते. तसंच अंबरनाथमधून आमदार झालेले नकुल पाटील, जगन्नाथ पाटील, शाबीर शेख हे देखील मंत्री झाले. त्यामुळे अंबरनाथला मंत्रिपदाचा वारसा असून तो जपला जावा, अशी इच्छा सुनील चौधरी यांनी व्यक्त केली. अंबरनाथकरांची ही इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नक्की पूर्ण करतील, असा विश्वासही सुनील चौधरींनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis oath ceremony : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या पोस्टरच्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे पोस्टर

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या पोस्टरच्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करत पोस्टर लावले आहेत.

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates :  मैं समंदर हूँ, लौट के आऊंगा, फडणवीसांचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल

२०१९ मध्ये मु्ख्यमंत्रीपदावरून सेना-भाजपा युती तुटली, तेव्हा नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह भल्या सकाळी शपथविधी उरकला. पण अवघ्या ७२ तासांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या भाषणात त्यांनी आपण पुन्हा येणार असल्याचे संकेत शायरीच्या माध्यमातून दिले होते. आता हा व्हिडीओ पुन्हा समोर येऊन सोशल मीडिया वर पुन्हा व्हायरल होतोय..

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस 3.0:

देवेंद्र फडणवीस 3.0: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत शपथविधी सोहळा होणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ घेणार आहेत.

मुंबईतील आझाद मैदानावर होणार भव्य शपथविधी सोहळा होणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांसोबत इतर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सोहळ्याला हजेरी लावणार

शपथविधी सोहळ्याला "लाडक्या बहिणी" सुद्धा उपस्थितीत राहणार आहेत.

cm devendra fadnavis profile : देवेंद्र फडणवीस यांचा थोडक्यात परिचय

देवेंद्र फडणवीस यांची ओळख

देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस

जन्मतारीख : 22 जुलै 1970

पालक : श्रीमती सरिता आणि स्व. गंगाधरराव फडणवीस

पत्नी: अमृता फडणवीस

मुलगी : दिविजा

शिक्षण

- एल. एल. बी. (नागपूर विद्यापीठ)

- व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी.

- डी. एस. ई. बर्लिन या जर्मनीतील संस्थेमधून ‘डिप्लोमा इन मेथड्स अ‍ॅन्ड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट’

राजकीय कारकीर्द

- नगरसेवक, नागपूर महापालिका (1992-97 आणि 1997-2001)

- महापौर/मेअर इन कौन्सिल, नागपूर (1997 ते 2001)

- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019, 2019-2004)

- मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (2014-2019)

- विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा (2019-2022)

- उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (2022 पासून)

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा होणार ऐतिहासिक

शपथविधीचा सोहळा ऐतिहासिक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दीड तासाचा शपथविधी सोहळा असेल. व्यासपीठावर असतील २६ मान्यवर; दोन राज्यपाल

२६ मान्यवरांमध्ये विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे राज्यातील प्रमुख तीन नेते ज्यात चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे प्रमुख नेते, लोकसभेतील शिवसेना गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व्यासपीठावर असतील.

शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला अजय अतुल यांच्या गीत संगीताची साथ असेल. सुरुवातीला ५:३० वाजता मुख्यमंत्री, त्यानंतर उपमुख्यमंत्री शपथ घेतील.

Devendra Fadnavis oath ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र म्हणून शपथ घेणार आहेत. बुधवारी भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झाली अन् पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झालं. २०१४ ते २०१९ यादरम्यान देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करत सर्वांनाच धक्का दिला होता. पण अवघ्या ७२ तासांत हे सरकार कोसळलं. त्यानंतर अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षनेता म्हणून काम पाहिले. २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झालं देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT