Maharashtra Closed Due To Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Closed : राज्यातील 'ही' शहरे राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?

Maharashtra Closed Due To Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. या निधनानंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात बंद पाळण्यात येत आहे.

Alisha Khedekar

  • अजित पवारांचा अपघाती मृत्यू

  • बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला

  • श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहर बंद!

महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठी दुर्घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळच्या सुमारास ८ वाजून ४६ मिनिटांनी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने अवघा महाराष्ट्र दुःखात आहे. पवार कुटुंबियांसह अनेक दिग्ग्ज नेते आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या चटका लावणाऱ्या घटनेनंतर राज्यातील अनेक शहर बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड, रायगड, बुलढाणा, धाराशिव, येवला इत्यादी ठिकाणी पूर्णतः बंद पाळण्यात आला आहे. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे यायला निघाले होते. राज्यात काही दिवसांत होणाऱ्या झेडपी निवडणुकांसाठी अजित पवार यांनी जोमाने तयारी सुरु केली होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र बारामतीत आल्यानंतर त्यांच्या विमानाला आग लागली.

या आगीनंतर विमान खाली कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. या विमानात अजित पवारांसह ६ जण होती. या ६ जणांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान ही घटना इतकी भीषण होती की कपडे आणि हातातील वस्तूंवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

अजित पवार यांच्या जाण्याने राज्यात शोकाकुल वातावरण निर्मण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शहरे बंद ठवेण्यात आले आहेत. या शहरांमध्ये पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड, रायगड, बुलढाणा, धाराशिव, येवला इत्यादी ठिकाणांचा समावेश आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी महापौराचे १६ वर्षांच्या मुलासोबत शरीरसंबंध; कोर्टाने ठरवले दोषी, राजकीय वर्तुळात खळबळ

Chanakya Niti: मुलांना यशस्वी बनवायचंय? पालकांनी ही सुत्र लक्षात ठेवा; चाणक्यांनी दिला श्रीमंत अन् हुशार होण्याचा सल्ला

Maharashtra Live News Update: प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालं यश

Ilkal Saree Pattern: लग्नसराई ते डेली वेअरसाठी; इलकल साडीचे हे ७ पॅटर्न नक्की ट्राय करा

Crime: माझ्या पुतणीशी का बोलतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली, मुलीच्या काकाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT