Devendra Fadnavis on Thackeray Victory Rally Saam Tv News
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Devendra Fadnavis on Thackeray Victory Rally : 'भाषेवर मारहाण करणं अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आम्हाला अभिमान आहे. आग्रह चुकीचा नाही. पण व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं चुकीचं आहे'.

Prashant Patil

मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषा हा वाद पेटला आहे. त्याचदरम्यान, तीन दिवसांपूर्वी मीरा रोड येथे एका व्यावसायिकाला काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्यावरुन मारहाण केली होती. त्यानंतर मीरा रोड परिसरातील संपूर्ण व्यावसायिकांनी आंदोलन केलं होतं. आता या सर्व घटनांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'भाषेवर मारहाण करणं अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आम्हाला अभिमान आहे. आग्रह चुकीचा नाही. पण व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं चुकीचं आहे. आपले मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात व्यावसाय करतात. महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्रात मराठी भाषा अभिमान ठेवणं चुकीचं नाही. भाषेवरून गुंडागर्दी करणारा सहन करणार नाही. ज्याप्रकारे घटना घडलीये त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुढे कुणी असा वाद केला तर कायदेशीर कारवाई होईल. मराठीचा अभिमान आहे. पण भारतातील कोणत्याही भाषेवर अन्याय केला जाऊ शकत नाही. मला आश्चर्य वाटतं की हे लोक इंग्रजीला जवळ करतात. हिंदी भाषेवर वाद करतात. हे कोणते विचार आहेत ही कोणत्या प्रकारची कारवाई आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल', असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विजय मेळाव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'दोघांनी नक्कीच विजय मेळावा घ्यावा. आमच्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो. पण त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी. समिती नेमणारे तेच, कॅबिनेट निर्णय घेणारे तेच, सही करणारे तेच आणि आता विजय मेळावा घेणारे तेच, मराठी माणसाच्या लक्षात येतं की कोण दुटप्पी आहे. आमचा निर्णय पक्का आहे. आम्ही समिती नेमलीय. विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे तोच निर्णय महाराष्ट्रात होईल', असंही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

SCROLL FOR NEXT