Shiv Jayanti 2025 social media
महाराष्ट्र

Shiv Jayanti : राज्यभरात शिव जयंतीचा उत्साह, शिवनेरीवर मोठा सोहळा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (१७ मार्च २०२५) रोजी तिथीनुसार जयंती आहे. या निमित्त राज्यभर मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Celebrates Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची आज (१७ मार्च २०२५) रोजी तिथीनुसार जयंती आहे. या निमित्त राज्यभर मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसंच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवरायांना अभिवादन केले. रायगडावर शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार करत शिवप्रेमी जल्लोष केला.

रायगडमध्ये शिव जयंतीचा उत्साह

आज फाल्गुन कृष्ण तृतीया, आज तिथीप्रमाणे शिव जयंती उत्सव साजरा होतो. तिथी प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या या शिव जयंतीचा उत्साह आज रायगडमध्ये पहायला मिळाला. शिव जयंती उत्सव साजरा केला जात असताना शिव ज्योत आणण्याची परंपरा येथे आहे. गावोगावच्या शिवप्रेमी मंडळांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिव ज्योत आणल्या. हातात मशाल, भगवा झेंडा आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करत शिवप्रेमी जल्लोष करीत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिल्या शिवमंदिराचे लोकार्पण -

भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण आज (१७ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण विधी, क्षेत्रपाल पूजन, होम हवन पूर्णाहुती यांसह अनेक विधी पार पडणार आहे. हे मंदिर एखाद्या गडकिल्ल्याप्रमाणे साकारलेले आहे. हे मंदिर केवळ एक दर्शनस्थळ नसून शक्तिपीठ म्हणून उभारले गेले आहे.

उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन -

मुंबईचा हा संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे साजरी होत आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आमदार सचिन आहेर आमदार अनिल परब आणि इतर नेते देखील यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवतीभवती मुलांनी सजावट केली होती. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT