Maharashtra CBSE Education CBSE Education
महाराष्ट्र

CBSE Education : सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Namdeo Kumbhar

Maharashtra CBSE Education : सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतलाय. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यास पॅटर्न राबवला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांमध्ये विविध चर्चा सुरु आहेत. तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम ठरला का? असा सवाल उपस्थित झालाय.

CBSE बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम -

CBSE बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याचे शिक्षणही दर्जेदार असावे, स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नयेत, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाईल.

राज्यात CBSE पॅटर्न?

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांची नवी आखणी, वेळापत्रकही बदलणार आहे. शिक्षक संघटनांशी चर्चा करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम लागू होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा -

'राज्यातील शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिकणारे विद्यार्थी बऱ्याचदा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात, असे निरीक्षण आहे. आपल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. मात्र हे बदल करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही विचार होणं गरजेचं आहे. तसचं गणवेश देताना झालेला घोळ अद्याप निस्तरता आलेला नाही. त्यामुळे नवा अभ्यासक्रम लागू करताना शिक्षण खात्यानं खबरदारी घ्यायला हवी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT