Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

भावनिक मुद्दा काढून तेढ निर्माण करणे महाराष्ट्राला परवडणार नाही : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीत राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेवून राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली होती. मशिदींवरील भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला होता. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीत राज ठाकरे यांच्यावर (Raj Thackeray) नाव न घेता टीका केली.

आज देशात आणि राज्यात जातीपाती आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भावनिक मुद्दा काढून तेढ निर्माण करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) नवा न घेता लगावला. सरकार येतील सरकार जातील पण त्याचा वापर योग्य रीतीने करणे गरजेचे आहे. सर्व समाजाला एकसंघ घेऊन जाण्याची गरज आहे, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

अलिकडच्या काळात तरुणांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. तरुणांच्या हातात मोबाईल आला आहे. थोडकीच माहिती मिळाली पाहिजे समाज काळानुसार बदलत आहे. आम्ही सत्तेवर आलो २ लाख शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ केले. वेळेवर परत फेड करणाऱ्यांना ५० हजार सवलत देण्याचे सांगितले. पण कोरोनाच्या काळात ते आमलात आणता आले नाही. पण आता त्याची यादी मागवून ते देण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आपण या भारतात राहत असताना जर दुसऱ्या राज्यात काही वेगळे देत असतील. पण हा महाराष्ट्र आहे. याठिकाणी महाराष्ट्र कुठे माघे राहणार नाही. असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT