Congress Saam TV
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवाराला संधी द्यायला हवी; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं वक्तव्य

ज्या ज्या वेळेला बाहेरच्या राज्यातून उमेदवारी दिली जाते. त्या वेळी नाराजी होत असते.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : ज्या ज्या वेळेला बाहेरच्या राज्यातून उमेदवारी दिली जाते. त्या वेळी नाराजी होणं स्वाभाविक असतं आणि ती नाराजी यावेळी सुद्धा झाली आहे. मात्र, अजूनही वेळ आहे त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारांची अदलाबदल करावी. असं वक्तव्य काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.

चव्हाण म्हणाले, मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी मी त्यांचे अभिनंदन केलं. मात्र, मी त्यांना नागपुरातून (Nagpur) उमेदवारी घेण्याचा सल्ला दिला. यामुळं त्यांचा संपर्क नागपूर आणि विदर्भात कायम राहीलं. तसंच इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) यांनी उत्तर प्रदेशमधून आणी मुकुल वासनिक यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज भरावा.

तसंच हा केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा निर्णय अशून त्यांनी विचारपूर्वकच ही उमेदवारी दिली असेल, मात्र, अजूनही वेळ आहे. त्यामुळे या दोन राज्यसभांच्या उमेदवारीमध्ये बदल केला पाहिजे असं माझं मत असून ही उमेदवारी बदलली जावी म्हणून मी प्रयत्न केला असल्याचं ते म्हणाले.

हे देखील पाहा -

दरम्यान, आज आयोजित केलेली बैठक का रद्द झाली, असं का झालं हे आकलन करण्यापलीकडे आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला (Congress) डावललं जातय हे खरं आहे. मात्र, सध्या काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नेत्यांनी लढत राहिलं पाहिजे यात काही अवघड नाही. आघाडीतुन काँग्रेस बाहेर पडणार नाही, संवाद वाढविला पाहिजे, समन्वय वाढविला पाहिजे, खातं कुणाकडेही असलं तरी निधी समान दिला पाहिजे. मात्र, असं होताना दिसत नाही. नाराजी वाढत असून याला वाचा फोडली पाहिजे असही चव्हाण यावेळी म्हणाले.

काँग्रेसमध्ये नाराजी नाही -

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरुन नाराजी नसल्याचं म्हंटलं आहे. राज्यसभेसाठी गुजराती व्यक्ती उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढतो, तेव्हा कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, काँग्रेसने काही केलं की बोलून दाखवलं जातं. असं पटोले म्हणाले. तसंच हे निर्णय हायकमांड घेत असतात, तरुण आणि उत्साही तरुणाला उमेदवारी देवून पक्षात नवचैतन्य निर्मान करण्याचा प्रयत्न केला असून याचं सगळ्यांनी स्वागतच केलं असल्याचं पटोले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

SCROLL FOR NEXT