वर्षाच्या अखेरच्या दिवशी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय
अंबादेवी संस्थानाला चिखलदरा येथील ३ एकर जमीन मंजूर
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या महापालिका निवडणुकीपूर्वी वर्षाच्या शेवटी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे महसूल विभागानं मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २०२५ या वर्षाची शेवटची बैठक पार पडली. यात अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन देण्याचा निर्णय या घेण्यात आलाय.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा धुमधडका सुरू आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल झालेत. सगळे राजकीय पक्ष आणि नेते मंडळी निवडणूक कामात व्यस्त आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील ‘श्री अंबादेवी संस्थान, अमरावती’ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुमारे ३ एकर ८ आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.
अंबादेवी संस्थानास ही जमीन विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलीय. अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानकडे चिखलदरातील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. चिखलदरा येथील सुमारे साडेसात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमिनीचा काही उपयोग होत नव्हता. त्यावर आजच्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.