Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion : भाजपचे धक्कातंत्र, २ दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता, नव्या चेहऱ्यांना संधी

Maharashtra Cabinet Expansion : भाजपमधून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन गेले आहेत. मागील मंत्रिमंडळातील काही नेत्यांना डच्चू देण्यात आलाय. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

Maharashtra Cabinet Expansion : नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज सकाळपासून भाजपकडून आमदारांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फोन गेले आहेत. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. तर मागील सरकारमधील दोन मंत्र्‍यांना धक्का दिलाय. भाजपकडून सुरेश खाडे आणि विजयकुमार गावत यांचं मंत्रिपद कापण्यात आलेय. तर रवींद्र चव्हण यांना दुसरी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रि‍पदाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहणारे सुरेश खाडे, विजयकुमार गावित यांना फडणवीस सरकारमध्ये वगळण्यात आलेय. भाजपकडून आतापर्यंत १४ जणांना मंत्रि‍पदासाठी फोन गेले आहेत. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित यांना फोन जाण्याची शक्यता नाही. वादग्रस्त आणि वाचाळविर नेत्यांना मंत्रि‍पदामधून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या आमदारांनाच मंत्रि‍पदासाठी फोन गेल्याचं समजतेय.

सुरेश खाडे यांच्याऐवजी भाजपने पश्चिम महाराष्ट्रात शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मिरज मतदारसंघात भाजपच्या सुरेश खाडे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला होता. त्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागेल, असेच सांगण्यात येत होते. पण त्यांचा पत्ता कट झालाय. तर विजयकुमार गावित यांच्यावर विधानसभा निवडणुकीआधी कुटुंबातूनच विरोध झाला होता. त्यांच्यावर गंभीर टीका करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मंत्रि‍पदाचा डच्चू मिळाल्याचे बोलले जातेय.

भाजपमध्ये कुणाला लागली मंत्रि‍पदाची लॉटरी?

  1. चंद्रशेखर बावनकुळे

  2. नितेश राणे

  3. शिवेंद्रराजे भोसले

  4. चंद्रकांत पाटील

  5. पंकज भोयर

  6. मंगलप्रभात लोढा

  7. गिरीश महाजन

  8. जयकुमार रावल

  9. पंकजा मुंडे

  10. राधाकृष्ण विखे पाटील

  11. गणेश नाईक

  12. मेघना बोर्डीकर

  13. अतुल सावे

  14. आकाश फुंडकर

  15. माधुरी मिसाळ

  16. संजय सावकारे

  17. अशोक उईके

रविंद्र चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी

रविंद्र चव्हाणांकडे भाजपकडून नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. रविंद्र चव्हाण यांकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी होती. एकट्या भाजपचे २००हून अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दीष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

SCROLL FOR NEXT