Radhakrishna vikhe Patil Saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil Profile: विधानसभा सदस्य ते गृहनिर्माण मंत्री, असा आहे राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजकीय प्रवास

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील हे मंत्री होणार आहे. थोड्याच वेळात ते मंत्रिपदाची शपथ घेतील. सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Priya More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आमदार झाले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे मंत्री होणार असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 रोजी झाला. त्यांनी बीएससी ॲग्री (कृषी) हे शिक्षण पूर्ण केले. राधाकृष्ण विखे -पाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणामध्ये एन्ट्री केली. 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे यांनी 1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. विधानसभेवर गेल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजकीय प्रवास -

- मार्च 1995 पासून विधानसभा सदस्य

- 1997 ते 1999 मंत्री, कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय

- जुलै 1999 विधानसभा सदस्यपदी निवड

- ऑक्टोबर 2004 विधानसभा सदस्यपदी निवड

- 19 फेब्रुवारी 2009 मंत्री, शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री, संभाजीनगर जिल्हा

- ऑक्टोबर 2009 विधानसभा सदस्यपदी निवड

- 7 नोव्हेंबर 2009 मंत्री, परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय

- 19 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014 मंत्री, कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा

- 19 ऑक्टोबर 2014 विधानसभा सदस्यपदी निवड

- 10 नोव्हेंबर 2014 काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड

- 24 डिसेंबर 2014 ते 4 जून 2019 महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते

- विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

- जून 2019 गृहनिर्माण मंत्री होते

- 2019 विधानसभा सदस्यपदी निवड

- 9 ऑगस्ट 2022 महायुती सरकारमध्ये महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्रिपदाची शपथ

- 23 नोव्हेंबर 2024 रोजी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT