State Cabinet Expansion Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अन् वेळ ठरली, ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार

Maharashtra cabinet expansion : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेय.

Namdeo Kumbhar

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झालेय. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांना झुकते माप दिल्याचे सूत्रांनी सांगितलेय. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०-१०-१० असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजतेय.

भाजपचाच वरचष्मा -

हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. भाजपचे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे वर्चचष्मा त्यांचाच असेल. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता तिन्ही पक्षाचे मिळून ३५ मंत्री शपथ घेणार असल्याचे समोर आलेय.

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २० खाती राहण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना १०-१० खाती मिळणार आहे.

कुणाकडे कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला महसूल मिळू शकते. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खाते इतर गटाला सोपवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीची बैठक, मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होणार -

मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम स्वरूप मुंबईतील महायुतीच्या बैठकीनंतर मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ही बैठक होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या अंतिम बैठकीनंतर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी दिल्लीला पोहचले आहेत. त्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी बुधवारी त्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील खातेवाटपावर चर्चा झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT