Maharashtra Cabinet Expansion  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आजच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, भाजपमध्ये जोरदार हालचाली

Shinde Fadnavis Govt : फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दौरा आटोपून तातडीने रात्रीतून दिल्ली गाठली आणि सकाळी ते पुन्हा महाराष्ट्रात दाखल झालेत अशी माहिती माध्यामांत झळकली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहे. आजच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दौरा आटोपून तातडीने रात्रीतून दिल्ली गाठली आणि सकाळी ते पुन्हा महाराष्ट्रात दाखल झालेत अशी माहिती माध्यामांत झळकली आहे. फडणवीस काल रात्री मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीसांच्या या घाईघाईने केलेली दिल्ली वारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला बळ मिळालं आहे.

फडणवीसांचा भेटीगाठींचा सापाटा

देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यात भेटीगाठींचा सापाटा लावला आहे. जयकुमार गोऱ्हे आणि राहुल कुल आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. तर दुसरीकडे काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी गेले आहेत.

फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी इथे बाहेरून कोणता नेता येणार नाही, इथलाच नेता असेल असे सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी देशमुखांची भेट घेतली आहे. त्यामुळे सावनेरमध्ये आशिष देशमुख यांना भाजपकडून तिकीट मिळणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

शिंदे गटातील 8 आमदारांना मिळणार मंत्रिपद?

राज्यात शिंदे-फउडणवीस सरकार येऊन आता वर्ष पूर्ण होईल तरी देखील दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता राज्यातील सत्तसंघर्षाचा निकाल देखील लागला आहे, त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील 8 आमदारांना मंत्रीपद मिळू शकते अशी चर्चा आहे.

संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर...

तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

सध्या मंत्रिमंडळात 18 मंत्री

यापूर्वी 9 ऑगस्ट 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. तेव्हा 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यातील 9 मंत्री भाजपचे तर 9 मंत्री शिंदे यांच्या गटाचे आहेत. एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमा झाले.

शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोण कोण?

राज्याच्या मंत्रिमंडळात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगल लोढा, विजयकुमार गावित हे मंत्री आहेत. तर शिवसेनेच्या शिंदे कॅटातून संदीपान भुमरे, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

SCROLL FOR NEXT