राहुरी पोटनिवडणुकीपूर्वी राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण.  saam tv
महाराष्ट्र

Rahuri By-Election: तनपुरेंचा डाव अक्षय कर्डिले यांचा गेम होणार का? राम शिंदेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Rahuri By-Poll : राहुरी पोटनिवडणुकीतील पाठिंबा आणि रणनीती यावर चर्चा करण्यासाठी राम शिंदेंनी प्राजक्त तनपूरे यांची भेट घेतली. आता प्राजक्त तनपुरे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bharat Jadhav

  • राहुरी पोटनिवडणुकीत तनपुरेंच्या निर्णयाला महत्त्व

  • राम शिंदे आणि तनपुरे यांची गुप्त भेट चर्चेत

  • भाजपकडून अक्षय कर्डिले यांना पाठिंब्यासाठी प्रयत्न

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना प्राजक्त तनपुरे यांनी पाठिंबा द्यावा, अशी भाजपनं विनंती केली आहे. पोटनिवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा? की भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा गेम करायचा हे तनपुरेंच्या हाती असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी केली जाते.

अक्षय कर्डिले यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री आज राहुरी येथे येणार आहेत, त्याआधी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तनपुरे यांची भेट घेतली आहे. राम शिंदे यांनी त्यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. पोटनिवडणुकीत तनपुरे कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता लागली आहे. आज सकाळपासून प्राजक्त तनपुरे आपल्या कार्यालयात पक्षातील नेत्याची बैठक घेत आहेत. पाठिंबा कोणाला द्यायचा याबाबत ते विचारमंथन करत आहेत. त्याचदरम्यान विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

दुसरीकडे हाती आलेल्या माहितीनुसार तनपुरे थेट भाजपमध्ये प्रवेश न करता, कर्डिले यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच तनपुरे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. यामुळे प्राजक्त तनपुरे भाजपचे कमळ हातात घेतील,अशी चर्चा आहे. याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तनपुरेंच्या भाजप प्रवेशाविषयी काही माहिती नाहीये.

मी प्राजक्त तनपुरे यांच्याशी अनेकदा बोलली आहे. गेल्याच आठवड्यात आमचं बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते आता निवडणूक लढू इच्छित नाहीत. त्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. ते आता लढणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. पण पुढे आपण एकत्र काम करत राहू, असे ते म्हणालेत.

तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय: तनपुरे

माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण अजित पवार गटात गेले गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाली. मात्र दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चाललंय, याचे दुःख होत आहे, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असे वाटले. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहिल त्याचे राजकारण संपतंय, याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत तनपुरे यांनी बोलून दाखवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT