Thackeray Ignores Shinde But Greets Fadnavis with a Smile Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ना भेट, ना नजरानजर, चर्चा मात्र गावभर; ठाकरेंकडून शिंदे दुर्लक्षितच, फडणवीसांचा मात्र ठाकरेंना नमस्कार

Maharashtra Budget Session: तु राहतो का मी राहतो अशा शब्दात एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे आज जेव्हा विधीमंडळात एकत्र आले तेव्हा हास्यविनोद करतांना दिसले. तर गेले अनेक वर्ष एकमेकांसोबत काम करणारे दोन नेते याचवेळी समोरासमोर आले तेव्हा मात्र त्यांनी नजरानजर पण टाळली. याच ना भेट आणि ना नजरानजरीच्या का झाल्या चर्चा गावभर पाहुया..

Tanmay Tillu

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुए.अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचे कामकाज तहकूब झालं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याचवेळी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली. या भेटीत नमस्कार-चमत्कार झाले. एकमेकांवर मिश्कील टोलेबाजी झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला.मात्र एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी पूर्ण दुर्लक्षित केलं.

दरम्यान,उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडिजचे भाव वाढवले नाहीत? असा खोचक प्रश्न विचारलाय.. विशेष म्हणजे फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते...मात्र उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांशी नजरानजरही केली नाही... बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावर उद्धव ठाकरेंनी मिश्कील प्रतिक्रिया दिली.

त्यानंतर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले आणि एकमेकांन नमस्कार केला. यावेळी ठाकरेंना दादांना हा तुमचा अर्थसंकल्प नाही, असा टोला लगावला. त्यावर अजित पवार जोरदार हसले आणि पुढे निघाले...त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणांपेक्षा नंतरच्या भेटीगाठींचीच खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT