Maharashtra Budget Session 2023 Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session 2023 Live : संजय राऊत यांच्या विधानानंतर सत्ताधारी आक्रमक; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.

Vishal Gangurde

संजय राऊत यांच्या विधानानंतर सत्ताधारी आक्रमक; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहे. सर्व सत्ताधारी आमदारांकडून संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध नोंदवला जात आहे. संजय राऊतांच्या विधीमंडळावरील विधानानंतर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झाला. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या प्रस्तावाची दखल; २ दिवसांनी निर्णय जाहीर करणार

संजय राऊत यांच्या वक्तव्याने विधीमंडळातील सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष हक्कभंग सूचना दिली आहे. संजय राऊत यांचं विधीमंडळ हे चोरमंडळ विधान हे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही बाब लोकप्रतिनिधी अपमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक, सभागृहात गदारोळ

संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. हक्कभंगाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची तयारी केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या अधिवेशन काळातच कार्यवाही पूर्ण करावी यासाठी भाजप आणि शिवसेना पक्ष आग्रही आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ आक्रमक

संजय राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ आक्रमक झालं आहे. विधानसभा अध्यक्षांकडून माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हक्कभंग नोटीसवर काय कारवाई करता येईल, यावर चर्चा सुरू आहेत. विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल

खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य संजय राऊत यांना करणं महागात पडलं आहे. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधीमंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.

संजय राऊत यांचं महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान; भाजप आणि शिवसेना सभागृहात हक्कभंग आणणार?

खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची तयारी केली आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवणार असण्याची शक्यता आहे, राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवणार असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक राज्यातील शेती, महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू केलं आहे.

विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होणार

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विरोधक पायऱ्यांवर आक्रमक होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री विरोधकांच्या प्रश्नांचा सामना कसा करणार?

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. आज विरोधकांकडून शिंदे सरकारला कोणत्या मुद्द्यावरून घेरणार, हे पाहावे लागणार आहे. विरोधकांचा प्रश्नांना सत्ताधारी कसे उत्तर देणार, याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT