Devendra fadnavis News Saam tv
महाराष्ट्र

Video :...तर उद्धव ठाकरेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात; फडणवीसांनी घेतला संजय राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सूरज सावंत

Devendra Fadnavis News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळावरील केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा सत्ताधारी नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

'कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये. आम्हीच नाही तर विधीमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरेही चोर आहेत का, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आहे. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राऊतांचे विधान मी ही ऐकले. जर ते चोर विधीमंडळ म्हणत असेल तर आम्ही या विधीमंडळत का बोलावं. हे योग्य नाही. इतके नेते या विधीमंडळाने पाहिले आहेत. देशातील सर्वात उत्तम विधीमंडळ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं',

'जर चोर या विधीमंडळाबाबत बोललं जात असेल तर विधीमंडळाला अर्थ राहणार नाही. मग कुणीही उठेल आणि काहीही बोलेल. म्हणूनच हक्कभंगाची तरतूद आहे. कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये. आम्हीच नाही तर विधीमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरेही ठरतात. राऊत हे जबाबदार नेते आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

'तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. पण आज आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. या विधीमंडळाचा घोर अपमान झालेला आहे. विधीमंडळाचा हा अपमान खपवून घेतला जाणार नाही. मी या वक्तव्याबद्दल नाराजी व निषेध वक्त करतो. पण यावर विधीमंडळ काय कारवाई करते हे जनता बघतेय, असे फडणवीस पुढे म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

कोल्हापुरात पोहोचताच संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते , ' ही बनावट शिवसेना आहे. हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT