Bachchu kadu News Saamtv
महाराष्ट्र

Bachchu kadu News: सचिन तेंडूलकरविरोधात बच्चू कडू आक्रमक! घरासमोर 'प्रहार स्टाईल'ने आंदोलनाचा इशारा; कारण काय?

MLA Bachchu Kadu: याआधी बच्चू कडू यांनी या जाहिरातींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही पत्र लिहले होते. ज्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी...

Bacchu Kadu On Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरच्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातीविरोधात आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणात आता बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) करत असलेल्या ऑनलाईन जाहिरातीवरुन बच्चू कडू (Bachchu Kadu) चांगलेच आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडूलकर करत असलेल्या जाहिरातींबाबत स्पष्टिकरण द्यावे अन्यथा त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

तसेच बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सचिन तेंडूलकर हे भारतरत्न आहेत, त्यांनी अशा जाहिराती करु नयेत ही आमची विनंती आहे. अन्यथा त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, याआधी बच्चू कडू यांनी या जाहिरातींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही पत्र लिहले होते. या पत्रामध्ये त्यांनी सचिन तेंडूलकर हे भारतरत्न असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या जाहिरातींचा परिणाम तरुणाईवर होत आहे. या जुगाराच्या जाहिरातींना महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांची कुटूंबे उध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

SCROLL FOR NEXT