Ram Mandir Inauguration Invitation Saam Tv
महाराष्ट्र

Ram Mandir: अखेर वादावर पडदा! उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली असून राममंदिर ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Ram Mandir Inauguration Invitation:

गेल्या काही दिवसांपासून राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली असून राममंदिर ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

२२ जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री रामांच्याय मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरात या सोहळ्याचा उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळत आहे. एकीकडे राममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अवघा देश भक्तीमय झाला असतानाच उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते.

ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राममंदिर सोहळ्याचे निमंत्रण नसल्याने भाजपवर (BJP) टीका केली जात होती. या संपूर्ण वादावर आता पडदा पडला असून उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टाने राममंदिर ट्रस्टकडून उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे महासचिव चंपक राय यांनी उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातील ५५ देशांचे १०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच देशभरातून सात हजार विशेष निमंत्रितही या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यामध्ये क्रिडा, सामाजिक, सिनेसृष्टी तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT